गोवा खाण प्रश्‍‍नावर उद्या दिल्लीत बैठक

दैनिक गोमन्तक
बुधवार, 2 डिसेंबर 2020

खाण प्रश्नावर दिल्लीत गुरुवारी  बैठक होणार आहे. दुपारी १२ वाजण्‍याच्‍या सुमारास होणाऱ्या या बैठकीत खाणपट्ट्यांचा लिलाव की सरकारी महामंडळ याविषयी चर्चा होणार आहे.

पणजी : खाण प्रश्नावर दिल्लीत गुरुवारी  बैठक होणार आहे. दुपारी १२ वाजण्‍याच्‍या सुमारास होणाऱ्या या बैठकीत खाणपट्ट्यांचा लिलाव की सरकारी महामंडळ याविषयी चर्चा होणार आहे.

खाणी लवकर सुरू करण्यासाठी गोवा खनिज निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी या बैठकीत आपली मते व्यक्त करणार आहेत. कायदेशीर पेच टाळून खाणी सुरू करण्यासाठी सरकारला कसरत करावी लागत असून त्याचे प्रतिबिंब गुरुवारच्या बैठकीत उमटणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाधिवक्ता देविदास पांगम आणि खाण खात्याचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या