‘जिल्हा पंचायती’ साठी नव्याने मोर्चेबांधणी सुरू

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

कोविड स्थितीमुळे स्थगित झालेली जिल्हा पंचायत निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची चिन्हे दिसू लागल्याने उमेदवारांमध्ये लगबग सुरू झाली असून उमेदवारांनी कार्यकर्ते व मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्र सुरू केले आहे

 

मडगाव: कोविड स्थितीमुळे स्थगित झालेली जिल्हा पंचायत निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची चिन्हे दिसू लागल्याने उमेदवारांमध्ये लगबग सुरू झाली असून उमेदवारांनी कार्यकर्ते व मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्र सुरू केले आहे. 

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या दृष्टीने इतर पक्षांमध्ये विशेष हालचाल जाणवत नसली तरी सत्ताधारी भाजपने मात्र नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा संदेश भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारांना दिला आहे. या संदेशास अनुसरून भाजपच्या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका व गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. 

मडगावमध्ये अलीकडे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी भाजपच्या उमेदवारांना जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.  कोविड संकटामुळे मार्चमध्ये होणारी जिल्हा पंचायत निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ही निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याचे संकेत आहेत. 

आधिक वाचा:

संबंधित बातम्या