गोवा ब्रेकिंग : मेळावली आयआयटी प्रकल्प रद्द

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

शेळ मेळावलीतील नियोजित आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांनी उभारलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

मेळावली : शेळ मेळावलीतील नियोजित आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांनी उभारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुपारी शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक मंत्री विश्‍वजित राणे, सत्तरीतील काही ज्येष्ठ नागरिक व विविध पंचायतीच्या सदस्यांबरोबर घेऊन हा प्रकल्प मेळावली येथे होणार नाही असे स्पष्ट केले.

लोकभावनेचा आदर करून व वाळपईचे आमदार तथा मंत्री विश्‍वजित राणे यांनी हा प्रकल्प सत्तरीत नको यासंदर्भात दिलेल्या पत्राची घेत तो रद्द करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. हा प्रकल्प गोव्यात होईल मात्र त्याची जागा सरकार चर्चा करून ठरवणार आहे असे स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या मेळावलीच्या आंदोलनाला अनेक गावांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केल्याने सरकारला माघार घ्यावी लागली.

संबंधित बातम्या