महिला काँग्रेसच्या सदस्यांना राज्यपालांना भेटण्यापासून रोखले

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

राज्यात विविध जीवनावश्‍यक वस्तूंच दर वाढल्याच्या निषेधार्थ प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यपालांना कांदे भेट देण्यात येणार होते. परंतु या सदस्यांना पोलिसांनी रस्त्याच्या मधीच अडविले. 

पणजी :   राज्यात विविध जीवनावश्‍यक वस्तूंच दर वाढल्याच्या निषेधार्थ प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यपालांना कांदे भेट देण्यात येणार होते. परंतु या सदस्यांना पोलिसांनी रस्त्याच्या मधीच अडविले. प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली आज महिलांनी राज्यपालांना कांदे भेट देण्याचा व निवेदन सादर करण्याचे आंदोलन छेडले होते. परंतु पोलिसांनी त्यांना अडविले. या आंदोलनाविषीय कुतिन्हो म्हणाल्या की, राज्यात सर्व जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढलेले आहेत. 

कांद्याचे, टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. त्याशिवाय डाळी व तेलाचे दरही वाढले असून, महिला वर्गाला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. टोमॅटोचे दर ५० टक्के वाढलेले आहेत. एका वर्षांत झालेली दरवाढ ही धक्कादायक आहे. भाजीपाल्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लोकांना चिकन-मटणाचे फार स्वारस्य नाही, पण भाजीपाल्यांशिवाय जेवण होत नाही.
प्रदेश महिला काँग्रेस देण्यासाठी आलेले निवेदन स्वीकारणे पोलिसांनी नाकारल्याने कुतिन्हो यांनी आपली भडास काढली. पोलिसांनी राजभवनात जाण्यास अडविता तर किमान निवेदन तरी स्वीकारावे, अशी विनंती केली. राज्यपालांना भेट देण्यासाठी आणलेली कांदे-बटाट्याची कोटरी व निवेदन घेऊन या महिला परतल्या.

संबंधित बातम्या