विद्यार्थ्यांना ‘कौशल्यप’तेचे बळ; जर्मनीच्या सिमेन्स कंपनीशी सामंजस्य करार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

या संस्थेमुळे मिळणाऱ्या शिक्षणाद्वारे राज्यातील आयटीआयमधील विद्यार्थी रोजगारक्षम बनेल, शिवाय कोरोनाच्या महामारीच्यानंतर येथील विद्यार्थी राज्याबाहेरील औद्योगिक क्षेत्रात काम करू शकतात, असा विश्वारस कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचे मंत्री विश्वजजित राणे यांनी व्यक्त केला. 

पणजी: राज्यातील कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) दिल्या जाणाऱ्या शिक्षणात अमुलाग्र बदलासाठी आणि येणाऱ्या आव्हानात विद्यार्थ्यांना रोजगारक्षम असे आवश्यंक त्या औद्योगिक क्षेत्रातील ज्ञान मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जागतिक दर्जाच्या जर्मनीच्या आयटीआयमध्ये ड्युअल व्हीईटी (व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण) देणाऱ्या सिमेन्स लिमिटेड या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. या संस्थेमुळे मिळणाऱ्या शिक्षणाद्वारे राज्यातील आयटीआयमधील विद्यार्थी रोजगारक्षम बनेल, शिवाय कोरोनाच्या महामारीच्यानंतर येथील विद्यार्थी राज्याबाहेरील औद्योगिक क्षेत्रात काम करू शकतात, असा विश्वारस कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचे मंत्री विश्वजजित राणे यांनी व्यक्त केला. 

मंत्रालयात आज सिमेन्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांबरोर कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्यामध्ये याविषयी सामंजस्य करार झाला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. याप्रसंगी सिमेन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील माथुर, कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचे सचिव सी.आर. गर्ग, ड्युशे जेसेलशाफ  इंटरझोनल झुसामेनारबेत (जीआयझेड) इंडियाचे प्रकल्प अधिकारी डॉ. रॉडने रेव्हिएर, स्ट्रॅटेजी ॲण्ड सस्टेनॅबिलिटीच्या प्रमुख लक्ष्मी चटर्जी, सिमेन्सेचे गोवाप्रमुख महेंद्र वानी, सिमेन्सचे मुख्य एचआर डेव्हिड लुरेन्का, राजेश लोलयेकर यांची उपस्थिती होती. 

मंत्री राणे म्हणाले की, या करारामुळे आयटीआय प्रशिक्षणार्थींना उत्तम शिक्षण देणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने या कराराचे टाकलेले पाऊल योग्य आहे. नव्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविता येणार आहे. सध्याच्या औद्योगिक क्षेत्रात कोणत्या रोजगाराची गरज आहे, त्यानुसार हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याचा उपयोग महामारीच्या संकटानंतर चांगल्या पद्धतीने होणार आहे. कारण, प्रशिक्षण घेतलेले आयटीआयचे विद्यार्थी केवळ गोव्यातच नाहीतर परराज्यांतील अनेक कंपन्यांत त्या-त्या क्षेत्रातील प्रशिक्षणामुळे रोजगार मिळवू शकणार आहेत. गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार होणार असल्याने त्याचा निश्चि्त उपयोग उद्योगक्षेत्रांना होईल. रोजगार मिळविणारे अभ्यासक्रम तयार करण्याची गरज असल्याचे आपण यापूर्वीही व्यक्त केली होती. 

जागतिक रोजगाराच्याण कक्षा रुंदावणार : विश्वहजित राणे
सिमेन कंपनीने घेतलेल्या या पुढाकारामुळे आम्ही त्यांचे अभिनंदन करीत आहोत. त्याशिवाय राज्य सरकारचे कौशल्य विकास आणि उद्योजक खाते त्यास पूर्ण सहकार्य करेल. गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळणार असल्याने केवळ स्थानिकच नाहीतर जागतिकस्तरीय कंपन्यांतही रोजगार मिळविणे या प्रशिक्षणामुळे शक्य होईल. इलेक्ट्रिशीयन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, फिटर, टर्नर आणि मशिनिस्ट ट्रेड या सामंजस्य कराराच्या कक्षेत येणार आहेत. या प्रशिक्षणाबरोबरच राज्यातील परदेशी भाषा शिकण्याची मोठी सुविधा आहे, त्या शिकून घ्याव्यात. त्यामुळे त्याचा फायदा परदेशातील नोकऱ्यांसाठी उपयोग होऊ शकतो, असे विश्व जित राणे यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या