विद्यार्थ्यांनी उच्च विद्याविभूषित व्‍हावे : जयवंत आडपईकर

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

आमच्या या सोसायटीच्या भागधारकांच्या मुलांनी शिक्षणाच्या विविध क्षेत्रात उत्तरोत्तर आपली कर्तबगारी बजावून उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न करावा. अंत्रूज महाल सरकारी सोसायटीला त्याचा गर्व आहे.

general बोरी : अंत्रूज महाल सहकारी पतसंस्थेच्या भागधारकांच्या इयत्ता बारावी व शालान्‍त परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच संस्थेच्या कार्यालयात झाला.

संस्थेचे अध्यक्ष नारायण नाईक, संचालक श्रीकांत नाईक, जयवंत आडपईकर, रामनाथ गुडेकर, शिवा नाईक, उद्देश नाईक, मंगलदास शिरोडकर, राजेंद्र ढवळीकर, सुहास नाईक, सुशांत स्वार, अलंकार पारकर, दिेनश फडते, ज्ञानेश्‍वर नाईक, शेख शब्बीर, सविता इब्रामपूरकर, नारायण रामा नाईक, माणिकराव गावणेकर, सुदेश नाईक आदी मान्‍यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता बारावीच्‍या परीक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या हर्ष स्वार, करुणा शिरोडकर, चिन्मय नाईक यांना शिष्यवृत्त्या देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना नारायण नाईक म्हणाले की, आमच्या या सोसायटीच्या भागधारकांच्या मुलांनी शिक्षणाच्या विविध क्षेत्रात उत्तरोत्तर आपली कर्तबगारी बजावून उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न करावा. अंत्रूज महाल सरकारी सोसायटीला त्याचा गर्व आहे.
याप्रसंगी जयवंत आडपईकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणातही मोठी प्रगती करून नावलौकिक मिळविण्याचे आवाहन केले. श्रीकांत नाईक यांचेही याप्रसंगी विद्यार्थ्यांचे कौतुक करणारे भाषण झाले. यावेळी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. व या सभेत अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले. अध्यक्ष नारायण नाईक यांनी स्वागत केले. तर अलंकार पारकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या