Kabaddi Tournament: आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत एमईएस, विद्या प्रबोधिनी महाविद्यालय विजेते

गोवा विद्यापीठाची कबड्डी स्पर्धा : अनुक्रमे पुरुष व महिला गटात बाजी
Kabaddi Tournament
Kabaddi TournamentDainik Gomantak

Kabaddi Tournament गोवा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात झुआरीनगर येथील ‘एमईएस’च्या वसंत जोशी महाविद्यालयाने, तर महिलांत पर्वरीच्या विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाने विजेतेपद मिळविले. स्पर्धा ताळगाव पठार येथील विद्यापीठाच्या ज्युबिली हॉलमध्ये झाली.

पुरुष गटातील अंतिम लढतीत एमईएस महाविद्यालयाने खांडोळा सरकारी महाविद्यालयावर 48-35 गुणफरकाने मात केली. महिलांच्या अंतिम फेरीत विद्या प्रबोधिनीने फोंड्याच्या पीईएस एसआरएसएन महाविद्यालयास 39-25 गुणफरकाने हरविले.

स्पर्धेत पुरुष गटात 32, तर महिला गटात 21 महाविद्यालयीन संघ सहभागी झाले होते. मिरामारच्या धेंपे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक पांडुरंग नाईक, कबड्डी प्रशिक्षक महाबळेश्वर सुर्लकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

Kabaddi Tournament
Goa Pharma Job Fair: फार्मा जॉब फेअरला उत्स्फुर्त प्रतिसाद, 17 कंपन्यांसह 1700 उमेदवारांची उपस्थिती

विजयी संघ

महिला: विद्या प्रबोधिनी महाविद्यालय: तन्वी नाईक, यश्मिता तळवडकर, पुष्पा विश्वकर्मा, दूर्वा पागी, चैताली गावस, सुमित्रा यादव, दीपा पुजार, स्लेन्किता म्हार्दोळकर, तन्वी बने, ऐश्वर्या शत्रिय, पिनाकी पेडणेकर, त्रिशा गावडे.

पुरुष: एमईएस वसंत जोशी महाविद्यालय: गणेश बिरदकर, रुपेश भोसले, राहुल जासावल, हुसेन यालाविगी, दनेश बाजंत्री, सागर सरोज, राहुल नागावत, लोहित नाईक, अरुण चव्हाण, अली अहमद गौंडी, नवीन गौंडर, राजीव पवार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com