गोव्यात येत्या तीन दिवसांत ऊन-पाऊस आणि पाणीच पाणी

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जून 2021

आजपासून रविवारपर्यंत गोवा राज्यात(Goa) अतिवृष्टी(Monsoon) होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पणजी: आजपासून रविवारपर्यंत गोवा राज्यात(Goa) अतिवृष्टी(Monsoon) होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  मान्सून राज्यात स्थिरावला असला तरी काही काळ ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. येत्या तीन दिवसांत मान्सूनचा जोर वाढेल. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने संततधार पाऊस होईल, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे. बुधवारी आणि गुरुवारी राज्यात कांही काळ पावसाने हजेरी लावली. काही भागांमध्ये पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाण्याच्या तळी साचल्याचे चित्र दिसून आले. पणजी शहरात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती. ( Meteorological department has warned of heavy rains in Goa from today to Sunday)

मोरजीत 8.50 लाखांच्या ‘एलएसडी’सह रशियन पर्यटकाला अटक  

ऊन-पाऊस आणि पाणीच पाणी
सध्या गेल्या दोन दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. पण, शहरात मात्र पाणीच पाणी दिसत आहे. बहुतेक रस्त्यांवर पाणी साचून रहदारीची कोंडी होत आहे. आधीच खड्डे त्यात पाणी, यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. पाण्याचा निचरा योग्य रितीने होत नसल्याने ही समस्या उद्‌भवत आहे.

तीन दिवसांत राज्याला अतिवृष्टीचा फटका बसणार आहे. याकाळात नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. सध्यातरी वादळाची शक्यता नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. पण, अतिवृष्टीमुळे वित्तहानी संभवण्याची शक्यता आहे. 
- राहूल एम., शास्त्रज्ञ, हवामान खाते

संबंधित बातम्या