Goa Politics: ‘मगो’ आणि ‘आप’ची होणार युती?

आमदार सुदिन ढवळीकर: कार्यपद्धतीच्या अंदाजासाठी दिल्लीला जाणार
आमदार सुदिन ढवळीकर आणि अरविंद केजरीवाल
आमदार सुदिन ढवळीकर आणि अरविंद केजरीवालDainik Gomantak

पणजी: आम आदमी पक्षाबरोबर (AAP) माझी बोलणी झाली आहेत व त्यांच्या नेत्यांनी दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले असल्याने लवकरच दिल्लीला (Delhi) जाणार आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीबाबतही अंदाज घेणार आहे. काँग्रेस व भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाबरोबर मगोची (MGP) युती होऊ शकते असे पक्षाचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (MGP MLA sudin Dhavalikar will travel to Delhi to review AAP's working methods)

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची कार्यकारी समिती व आपण दिल्लीला जाणार आहोत. ‘आप’च्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली जाणार आहे. मगोमध्ये फुटीरांना पुनर्प्रवेश व उमेदवारीही नसेल असा ठराव समितीने यापूर्वीच घेतलेला आहे. राज्यात ‘उड्या’ मारणाऱ्या आमदारांवर बंदी यायला हवी व यामध्ये सुसूत्रता हवी. मगोतर्फे 24 मतदारसंघामध्ये चाचपणी सुरू असून 18 उमेदवार निश्‍चित झाले आहेत. मये मतदारसंघात तीन उमेदवार आहेत, त्यापैकी माजी सभापती अनंत शेट यांचे भाऊ हे या मतदारसंघात उमेदवारीसाठी आहेत. लोकांना तोडफोड करणारे भाजप किंवा काँग्रेस पक्ष हवेत की गेली 17 वर्षे मगोने केलेले राज्य हवे आहे हे लोकांनी येत्या विधानसभा निवडणुकीत ठरवावे, असे मत ढवळीकर यांनी व्यक्त केले.

राज्यातील लोकांना 25 घनमीटर पाणी मोफत देऊ

सत्तेवर आल्यास ‘आप’ने गोव्याला 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्‍वासन दिले आहे. यासंदर्भात विचारले असता ढवळीकर म्हणाले की, आम्ही सत्तेवर आल्यास राज्यातील लोकांना 25 घनमीटर पाणी मोफत देऊ. यापूर्वी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यातील पेट्रोल व डिझेलचा दर 60 रुपयांपेक्षा अधिक लागू केला जाणार नाही असे आश्‍वासन दिले होते ते त्यांनी कायम ठेवले. मात्र, त्यानंतर या सरकारने त्याचे पालन केले नाही. त्यानुसारच सत्तेवर असलेल्या सरकारने ठरवले तर सर्व काही शक्य आहे असे त्यांनी सांगितले.

साखळीत काल काँग्रेसने सद्‍बुद्धी यात्रा आयोजित केली होती त्याचा निषेध म्हणून भाजपचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचा मगो पक्ष निषेध करत आहे. या ठिकाणी हजारो भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून अशोभनीय वर्तन केले हे लोकशाहीसाठी घातक आहे. राज्यात जमावबंदी तसेच संचारबंदी लागू असतानाही ते निदर्शने करत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मात्र ते फक्त बघ्याची भूमिका बजावत होते, अशी टीका ढवळीकर यांनी केली.

‘जुने गोवेतील स्थानिकांना पाठिंबा’

जुने गोवे पुरातन वारसा क्षेत्रातील 300 मीटर परिघात नवीन बांधकामाला परवानगी नाही. जर एखाद्या बांधकामाची डागडुजी करायची असल्यास त्यासाठी भारतीय पुरातन सर्वेचा ना हरकत दाखला लागतो. त्यामुळे जुने गोवे येथील स्थानिकांनी जो विरोध केला आहे त्याला मगोचा पाठिंबा आहे, असे ढवळीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com