
Mahadayi Water Dispute 'आम्ही सर्व गोमंतकीय म्हादईच्या संरक्षणासाठी एकत्र आहोत' हे ब्रीद वाक्य सार्थ ठरवण्यासाठी 'सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंट'तर्फे आज पणजीत संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत शहरातील विविध भागांत ‘मानवी साखळी’चे आयोजन करण्यात आले होते.
म्हादईची निरंतरता कायम रहावी, यासाठी राज्यातील कलाकार मंडळी शनिवारी जागृतीसाठी मानवी साखळीच्या रूपाने आंदोलनात सहभागी झाली.
राज्यातील विविध एनजीओ तसेच सांस्कृतिक संघटनांनीदेखील या मानवी साखळीला पाठिंबा दर्शविला.
विरोधी पक्षनेता युरी आलेमाव, केपे आमदार अल्टोन डिकॉस्टा, अमरनाथअल्डोना, सरचिटणीस एव्हरसन वेल्स, महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नाईक यांनी म्हादईसाठीच्या "मानवी साखळी" मध्ये सहभाग घेतला.
तसेच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई कार्यकर्त्यांसह मिरामार येथे म्हादईसाठी मानवी साखळीत सहभागी झाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.