Mhadai Water Dispute : म्हादई जलतंटा लवादाला एक वर्षाची मुदतवाढ

गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये म्हादई नदीच्या पाण्यावरून विवाद आहे.
Mhadai River
Mhadai RiverDainik Gomantak

पणजी : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन केलेल्या म्हादई जलतंटा लवादाला आपला पुढील अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या विनंतीवरून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये म्हादई नदीच्या पाण्यावरून विवाद आहे.

न्यायालयाच्या आदेशापूर्वी कर्नाटकने या नदीवर कळसा भंडुरा या जागेवर बांध बांधून स्वतंत्र कालवा काढून या नदीचे पाणी वळवले आहे. त्यामुळेच हा वाद वाढला आहे. या नदीच्या पाण्यावर महाराष्ट्र राज्यानेही आपला हक्क सांगितला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला असला तरी याबाबतचे इतर विषय प्रलंबित आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने स्थापन केलेल्या म्हादई जलतंटा लवादाला अहवाल सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली आहे.

Mhadai River
Free Cylinder in Goa : गुडन्यूज; गोव्यात 37 हजार कुटुंबांना आता मिळणार मोफत सिलिंडर

दरम्यान गोव्याला मिळालेला म्हादईच्या पाण्याचा वाटा मान्य नाही. लवादासह सर्वोच्च न्यायालयातही हा विषय प्रलंबित आहे. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यावर जललवाद निर्णय घेणार आहे. ऑगस्टमध्ये 2022 मध्ये या विषयावर सुनावणी होणार आहे, अशी माहिती पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com