
Garbage Collection in Mapusa: म्हापसा शहरातील संपूर्ण कचरा संकलन खासगी एजन्सीमार्फत आऊटसोर्स करण्याचा प्रकल्प सुरू करण्याच्या म्हापसा पालिकेच्या प्रस्तावाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे.
गोवा राज्य नागरी विकास एजन्सीने (जी-सुडा) या योजनेबद्दल अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या पालिकेला शहरातील विविध मोकळ्या ठिकाणी साचलेला कचरा उचलण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.
पालिकेने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घरोघरी जाऊन कचरा संकलन, रस्ते झाडणे, बागेतील कचरा उचलणे आणि ब्लॅक स्पॉट्स साफ करणे यासह संपूर्ण कचरा उचलण्याचे काम खासगी एजन्सीमार्फत आऊटसोर्स करण्याचा संकल्प केला होता, जेणेकरुन म्हापशातील एकंदर कचरा व्यवस्थापन सुधारता येईल.
या ठरावानुसार, घरोघरी जाऊन कचरा संकलन व इतर कचऱ्याशी संबंधित कामे हाताळण्यासाठी आपले कामगार व यंत्रणा खासगी एजन्सीकडे सोपविण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.
सदर ठराव मंजूर केल्यानंतर लगेचच प्रकल्पाला हिरवा सिग्नल मिळावा यासाठी हा प्रस्ताव पुढे जी-सुडाकडे पाठविण्यात आला होता. सुमारे चार महिन्यांपासून हा प्रस्ताव या विभागात अडकून पडला आहे. दुसरीकडे शहरातील कचरा उचलणे म्हापसा पालिकेला अडचणीचे ठरत आहे.
या ठरावाच्या प्रस्तावानुसार, खासगी एजन्सीकडे घरोघरी विलगीकरण केलेला कचरा, बाग व ई-कचरा, डेब्रिज, डायपर/पॅम्पर्स गोळा करण्याची व संपूर्ण पालिकेच्या बाजारपेठेतील कचरा हाताळण्याची जबाबदारी असेल.
कचरा उचलण्याच्या विषयाचा आम्ही जी-सुडाकडे पाठपुरावा करतोय. म्हापसा पालिकेने सादर केलेल्या प्रस्तावावर या विभागाने काही तांत्रिक शंका उपस्थित केल्या आहेत. आम्ही त्या सर्व शंका दूर करू आणि लवकरच आम्हाला अनुकूल प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
- प्रिया मिशाळ, म्हापसा नगराध्यक्षा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.