चतुर्थीनंतर म्हापशात कोरोनाच्या रुग्णांत वाढ

वार्ताहर
रविवार, 30 ऑगस्ट 2020

गणेशचतुर्थीनंतर म्हापसा शहरात कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्या संख्येमध्ये प्रतिदिन वाढ होत चालली आहे. करासवाडा येथे एकाच कुटुंबात आठ तर खोर्ली कासारवाडा येथे एकाच कुटुंबात १२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

म्हापसा: गणेशचतुर्थीनंतर म्हापसा शहरात कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्या संख्येमध्ये प्रतिदिन वाढ होत चालली आहे. करासवाडा येथे एकाच कुटुंबात आठ तर खोर्ली कासारवाडा येथे एकाच कुटुंबात १२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच म्हापसा शहराच्या प्रत्येक भागात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाधित झाल्यामुळे म्हापसेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

२६ ऑगस्टला २७ कोरोना पॉझिटिव्ह, २७ ऑगस्ट १० कोरोना पॉझिटिव्ह, २८ ऑगस्टला २८ कोरोना पॉझिटिव्ह, २९ ऑगस्टला २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाधित झाले आहेत. गणेशचतुर्थीच्या पाचव्या दिवसापासून आजपर्यंत ८५ कोरोना बाधित झाले आहेत तर १ रुग्णाचा कोरोना बळी गेला आहे. आजपर्यंत म्हापसा शहरात २११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाधित आहेत.

म्हापसा शहराच्या करासवाडा, खोर्ली, खोर्ली सीम, पेडे, आंगड, गावसवाडा अशा भागात कोरोनाचे बळी गेले आहेत. आतापर्यंत म्हापसा शहरात आठ कोरोना पॉझिटिव्ह होऊन बळी गेले आहेत. आज (शनिवारी) डांगी कॉलनी २, फेअर आल्त ६, पेडे ३, गणेशपुरी २, कुचेली १, दत्तावाडी १, शेटयेवाडा १, खोर्ली १ असे रुग्ण बाधित झाले.

गणेशोत्सवात म्हापसा शहरातील अनेक कुटुंबियानी कोरोना महामारीचे महत्व विसरले होते. सरकारच्या नियमाचे तीन तेरा केले गेले विसर्जन मिरवणुकीला दोन सदस्यांना परवानगी असताना घरातील सर्व मंडळी विसर्जन स्थळी गेली. खोर्ली भागात मोठ्या प्रमाणात दारू सामानाची आतषबाजी करण्यात आली अशा परिस्थितीमुळे म्हापसा शहरात कोरोना रुग्ण बाधित झाले.

संबंधित बातम्या