म्हावळींगे गावाच्या लोकांंचा मतदानावर बहिष्कार तर दुसरीकडे काँग्रेसच्या अमरनाथ पणजीकरांचे पीपीई कीट घालून मतदान

गोमंतक ऑनलाईन टीम
शनिवार, 12 डिसेंबर 2020

जिल्हा पंचायत मतदारसंघातील वन-म्हावळींगे पंचायत क्षेत्रामध्ये म्हावळींगे गावाच्या मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे.

कारापूर-जिल्हा पंचायत मतदारसंघातील वन-म्हावळींगे पंचायत क्षेत्रामध्ये म्हावळींगे गावाच्या मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे.
 
या गावातील दोन मतदान केंद्रावर मिळून 1हजार 162 मतदारांना मतदानाचा हक्क होता. यापैकी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले दोन स्थानिक बीएलओ वगळता एकाही मतदाराने मतदानात भाग घेतला नाही.

याव्यतिरिक्त खोर्जुवे बार्देश येथे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर व कुटुंबीयांनी पीपीई कीट घालून जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदान केले.

संबंधित बातम्या