गोमंतपुत्र होतोय भारतीय सेनादलातील उच्चाधिकारी

मेजर जनरल मायकल फर्नांडिस यांची कर्तबगारी गोमंतकीय युवकांसाठी प्रेरणादायी
Michael Fernandes
Michael FernandesDainik Gomantak

पणजी: गोमंतकीय युवकात सेनादलाचे आकर्षण तसे कमीच. परंतु मेजर जनरलपदी असलेला गोमंतकीय वंशाचा एक सेनाधिकारी आता लेफ्टनंट जनरल बनणार आहे. काही सप्ताहांनंतर मेजर जनरल मायकल अँथनी ज्यूड फर्नांडिस यांच्या छातीवर लेफ्टनंट जनरलपदाचे तीन तारे विराजमान होतील. याआधी त्या पदापर्यंत अवघेच कर्तबगार पोहोचले आहेत. (Michael Fernandes to become lieutenant general)

Michael Fernandes
गोव्याचा वाढला पारा; घामाच्या लागल्या धारा

गोव्याचा वारसा सांगणाऱ्या उच्चाधिकाऱ्यांत आहेत, एक लष्करप्रमुख (कुडतरीचे जनरल सुनीथ फ्रान्सिस्क रॉड्रिग्स), सेनादलाचे तीन कमांडर (लेफ्ट. जन. एरिक व्हाज- साळगाव, लेफ्ट. जन. स्टॅनली मिनेझीस- सांगोल्डा आणि लेफ्ट. जन. वॉल्टर पिंटो- सांताक्रुझ) आणि तीन लेफ्टनंट नजरल (लेफ्ट. जन. बॉबी बार्रेटो- राय, लेफ्ट. जन. फ्रान्सिस डायस- वेळसाव आणि लेफ्ट. जन. केविन डिसोझा- म्हापसा) आहेत. म्हणजेच मेजर जनरल मायकल फर्नांडेझ हे उच्चपदापर्यंत पोहोचणारे आठवे गोमंतकीय आहेत.

मेजर जनरल फर्नांडेझ मूळचे साळगावचे. त्यांचे आजोबा आपले जन्मगाव सोडून भारतीय रेल्वेच्या सेवेत रुजू होण्यासाठी थेट बिहारात (Bihar) गेले. त्यावेळी रेल्वेत अधिकारी म्हणून केवळ ब्रिटीश आणि अँग्लो इंडियन्सना घेत. मायकल यांचे वडिलही रेल्वेतच होते, पण त्यांची बदली बंगळुरूला झाली. मायकल यांचा जन्म 1967 सालचा. त्यांचे प्रारंभिक शिक्षण अर्थातच बंगुळुरूमध्ये झाले. नंतर पुण्याच्या एनडीएमध्ये प्रवेश घेत त्यांनी 1987 पर्यंत तेथे अध्ययन केले. डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीच्या 82व्या नियमित बॅचचे स्नातक म्हणून यश संपादन केल्यानंतर त्यांना मद्रासस्थित कॉर्पस ऑफ इंजिनियर्समध्ये (मद्रास सॅपर्स) 1988 साली सामावून घेण्यात आले. नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे लेफ्ट. जन. बॉबी बार्रेटोही याच कॉर्पसचे तसेच 29वे (भावी) लष्करप्रमुख लेफ्ट. जन. मनोज पांडेही याच कॉर्पसचे होते.

Michael Fernandes
21 एप्रिल दिनविशेष: जाणून घ्या इतिहासात आज काय घडले

मेजर जन. मायकल यांचे वडील साळगावचे तर नैरोबी- केिनयात जन्मलेल्या त्यांच्या मातोश्री मूळच्या हळदोणा येथील आहेत. 33 वर्षांच्या सैनिकी सेवेत मेजर फर्नांडेझ यांनी विविध कारवायांत भाग घेतला आणि अनेक ठिकाणी कर्तव्यपूर्ती केलीय. श्रीलंकेत पाठवलेल्या भारतीय शांतीसेनेचे (1989-90) ते सदस्य होते आणि लेबनॉनमध्ये पाठवलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या दलांतही (2001-02) त्यांचा सहभाग होता. त्यांची जनरल केडरसाठी निवड झाल्यानंतर भारतीय सेनादळाच्या फायटिंग फॉर्मेशनची कमान त्यांच्याकडे सोपवण्यात आली. वालुकामय सेक्टरमध्ये त्यानी आधी अ‍ॅम्फिबियस पायदळाची ब्रिगेड तसेच नंतर एका पायदळाच्या तुकडीचे नेतृत्व केले. 2004 साली जो भारत आणि अमेरिकी लष्कराचा संयुक्त युद्ध अभ्यास (16वे संस्करण) झाला , त्याचे यजमानपद मेजर जनरल फर्नांडेझ यांच्या तुकडीला देण्यात आले होते. हा अभ्यास पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या वाळवंटांत करण्यात आला आणि त्यात दहशतवाद आणि घुसखोरीविरोधी कारवाईचा सरावाचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com