म्हापसा बसस्थानकाच्या कामावरुन मायकल-जोशुआमध्ये जुंपली

म्हापसा बसस्थानकात जनतेचा पैसा हा व्यर्थ गेला
Michael Lobo-joshua d'souza
Michael Lobo-joshua d'souzaDainik gomantak

गोवा सरकारच्या (Goa Government) साधनसुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून 10,075 चौमी जागेवर बसस्थानकाचं बांधकाम करण्यात आलं आहे. आतापर्यंत या बसस्थानकाच्या बांधकामावर 4.91 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या बसस्थानकाच्या आवारात बससोबतच टेंपो, कार, रिक्षा, दुचाकी यांनाही पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तसंच कदंबचं कार्यालय, चालकांसाठी सोय, प्रवाशांसाठी शेड, कँटीन, स्वच्छतागृह, हायमास्ट, मार्केट यार्डापर्यंत जाणाऱ्या 10 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या बांधकामाचा पहिल्या टप्प्यातील कामात समावेश आहे.

Michael Lobo-joshua d'souza
लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री मारिया आवरोरा कुतो यांचे निधन

दरम्यान, म्हापसा बसस्थानकात जनतेचा पैसा हा व्यर्थ गेला आहे, तसेच या बसस्थानकाच्या कामाचा दर्जा हा पूर्ण पणे निकृष्ट आहे. यात भाजपने मोठा घोटाळा केला आहे. हा सगळा पैसा म्हापसावासी जनतेचा आहे. यात महापालिकेने लक्ष घालायला हव असही मत त्यांनी यावेळी मांडले, तसेच तो पैसा जीएसआयडीसीच्या हातात देऊन यात घोटाळा केला आहे, असा आरोप नेते मायकेल लोबो यांनी केला आहे. याला प्रत्युत्तर देत नेते जोशुआ डिसोझा (joshua d'souza) यांनी त्यांचे हे आरोप फेटाळत लावले आणि मायकेल लोबो (Michael Lobo) यांनी कितीही टीका केल्या तरी त्याचा भाजपवर (BJP) काही परिणाम होणार नाही, तसेच त्यांचे हे आरोप निराधार असल्याच मत त्यांनी मांडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com