Michael Lobo : भाजप सोडणे ही माझी चूक होती

भाजपमध्ये परत येत मी चुक सुधारली
Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak

गोवा काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसवर पलटवार करणे सुरु केले आहे. यापुर्वीच आमदार संकल्प आमोणकर यांनी काँग्रेसच्या वरिष्ट नेत्यांनी उमेदवारीसाठी पैसे उकळल्याचा आरोप केला. यानंतर आता मायकल लोबो यांनी ही भाजप सोडून आपण चूक केली होती असे म्हटले आहे.

(Michael Lobo said It was my mistake to quit BJP over minor differences I have rectified it now)

Michael Lobo
Panaji Bus stand : पणजी बस स्थानकावरील बाकांमुळे प्रवाशांची गैरसोय

यावेळी बोलताना लोबो म्हणाले की, किरकोळ मतभेदांवरून भाजप सोडणे ही माझी चूक होती, ही चूक आता सुधारली आहे. आपल्याकडून चूक झाल्याचे सांगत लोबो म्हणाले की, “पक्ष नेतृत्वात काही मतभेद होत असतात याचा अर्थ असा नाही की पक्ष सोडावा. त्यावेळी मी संयम राखत पक्षश्रेष्ठींशी संवाद साधला असता तर मला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चुक टाळता आली असती असे ही ते यावेळी ते म्हणाले.

Michael Lobo
Old Goa : ओल्ड गोवा शिवमंदिरात पालखी सोहळा उत्साहात

'या' काँग्रेस नेत्यांनी ठोकला काँग्रेसला रामराम

मायकल लोबो, दिगंबर कामत, अलेक्सो सिक्वेरा, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर आणि दिलायला लोबो या माजी काँग्रेस आमदारांनी भाजपचे प्रवेश केला. यांचे स्वागत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि पक्षाचे इतर नेते यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com