विकास साधताना दडपशाहीला थारा नाही

मायकल लोबो : ‘टुगेदर फॉर कळंगुट’ पॅनल सर्वांगीण विकास साधणार
Michael Lobo | Congress vs BJP
Michael Lobo | Congress vs BJPDainik Gomantak

कळंगुट : कळंगुट पंचायत मंडळाने आतापर्यंत कुणाच्याही उद्योग, व्यवसायावर घाव न घालता एकजुटीने तसेच सर्वसंमतीने विकास साधला. यापुढेही ‘टुगेदर फॉर कळंगुट’ या बॅनरखाली पंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पॅनलकडून कळंगुटचा सर्वांगीण विकास कोणालाही कुठल्याच प्रकारचा धाक न दाखवता साधण्यात येणार आहे, असा दावा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केला. पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी मायकल लोबोंसह कळंगुटचे माजी सरपंच शॉन मार्टिन्स, ‘टुगेदर फॉर कळंगुटचे’ उमेदवार पावलो थॉमस डिसोझा, चंद्रकांत काशिनाथ चोडणकर, अनुष्का कुंदन केरकर, संगीता अशोक मोरजकर, मंजीत कृष्णा पार्सेकर, शॉन सिल्वेरा, फ्रान्सिस्को रॉड्रिगीस, सूरज गुरुदास नाईक, दिनेश सुरेश सिमेपुरुषकर, अॅड. सोनिया दत्तप्रसाद दाभोलकर तसेच फिलोमेना फर्नांडिस उपस्थित होत्या.

यावेळी मागच्या कार्यकाळात मावळत्या पंचायत मंडळाकडून पूर्ण करण्यात आलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती देण्यात आली.

राज्याच्या नगरनियोजन प्राधिकरणाकडून बार्देशातील कळंगुट, कांदोळी, पर्रा तसेच नागवा-हडफडेतील जुन्‍या आराखड्यासंदर्भात करण्यात आलेल्या बदलांचे आपण स्वागत करतो. याबाबत विनाकारण अधिक भाष्य करून आपल्याला अडचणीत यायचे नाही. आपण मंत्री असताना याबाबत मंत्री विश्वजीत राणे यांच्याशी चर्चा केली होती, असे लोबो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com