मायकल लोबो यांची दिल्ली भेट; काय झाले भेटी दरम्यान...

माझी पत्नी गेली पंधरा वर्षे राजकारणात असून दहा वर्षे सातत्याने पंचायतीच्या सरपंच होत्या. आता शिवली मतदार संघातून ती निवडणूक लढवणार आहे.
मायकल लोबो यांचा दिल्ली दौरा
मायकल लोबो यांचा दिल्ली दौरा Dainik Gomantak

दाबोळी: गोव्याचे माहिती-तंत्रज्ञान (IT)आणि घनकचरा व्यवस्थापन(SWM) मंत्री मायकल लोबो (Michael Lobo)यांच्या खास दिल्ली भेटीनंतर गोव्यात दाबोळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले, पक्षाने दिल्लीत चर्चेसाठी बोलावून घेतले होते. गोव्याच्या विधानसभा निवडणुकी विषयी चर्चा झाली. सदर बैठक पक्ष पातळीवर होती. इतर आमदारांना मंत्र्यांनाही दिल्लीत बैठकीस बोलावण्यात येईल.

गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसमध्ये (Congress)जाणार अशी चर्चा असलेले गोव्याचे तंत्रज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांची काल नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसंदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान मायकल लोबो यांचे गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले.

मायकल लोबो यांचा दिल्ली दौरा
दाबोळी येथे विनामास्क फिरणार्‍यांविरोधात वास्को पोलिसांकडून कारवाई

त्यांनी सांगितले की, सदर बैठक पक्ष पातळीवर होती. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच तुमची पत्नी निवडणूक लढविणार? यावर ते म्हणाले की, माझी पत्नी गेली पंधरा वर्षे राजकारणात असून दहा वर्षे सातत्याने पंचायतीच्या सरपंच होत्या. आता शिवली मतदार संघातून ती निवडणूक लढवणार आहे.

गोव्याचे माहिती तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांची काल नवी दिल्ली येथे भेट घेतली ते छायाचित्र. त्यांच्या समवेत गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com