Goa Politics: माजी पर्यटन मंत्र्यांनी केली रंग दाखवायला सुरवात

दोन आठवड्यापूर्वीच काँग्रेस पक्षात सामील झालेले माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांनी आपले रंग दाखविण्यास सुरवात केली आहे
Goa Politics: माजी पर्यटन मंत्र्यांनी केली रंग दाखवायला सुरवात
Mickky PachecoDainik Gomantak

मडगाव: दोन आठवड्यापूर्वीच काँग्रेस (Congress) पक्षात सामील झालेले माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको (Mickky Pacheco) यांनी आपले रंग दाखविण्यास सुरवात केली आहे. गोव्यात (Goa)काँग्रेस समितीने गट अध्यक्षांच्या पुन्हा नियुक्त्या (Appointments) केल्या आहेत, त्यावर त्यांनी आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.

Mickky Pacheco
Goa: गोवा माईल्स व पर्यटन टॅक्सी मीटर प्रकरणी पणजीत धरणे आंदोलन

पाशेको हे आपल्या आताताई स्वभावासाठी परिचित असून यापूर्वी त्यांनी कित्येक वादग्रस्त विधानेही केली आहेत. या गट अध्यक्षांच्या नियुक्त्यावर बोलताना म्हाताऱ्यानांच पदे का ? असा सवाल त्यांनी केला. नुवे मतदारसंघाचे काँग्रेस गट अध्यक्ष मानुएल डिकॉस्ता यांचे वय 75 वर्षे आहे. अशा माणसाचा पक्षाला फायदा काय? असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेस कार्यकारिणीत फेरबदल करण्याच्या इराद्याने मागच्या आठवड्यात राज्यातील सर्व गट समित्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यातील 9 गट समित्यांवर पूर्वीच्याच अध्यक्षांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. याच कारणामुळे मिकी नाराज असून जर त्यांनाच पुन्हा नेमायचे होते तर समित्या बरखास्त का केल्या असा सवाल त्यांनी केला. जुन्या समित्या बरखास्त करून नव्याना संधी मिळणार अशी आम्हाला आशा होती. पण ती नष्ट झाली असे पाशेको म्हणाले.

Mickky Pacheco
Goa: काँग्रेसच्या सोशल मीडिया ट्रेंडला देशभर प्रचंड प्रतिसाद

पाशेको यांनी आपली नाराजी काँग्रेसचे गोवा निरीक्षक पी. चिदंबरम आणि प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्याकडेही मांडल्याची माहिती मिळाली आहे. पण त्या अध्यक्षांची फेर नियुक्ती करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधून या नियुक्त्या कुणाच्या सांगण्यावरून केल्या असा सवाल त्यांना केल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com