
गेल्या पाच वर्षांत राज्यातील गुन्हेगारी वाढत आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये खून, बलात्कार व रस्ता अपघातांत वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनांमध्ये गोव्याव्यतिरिक्त परप्रांतीयांकडून केलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी हि जास्त आहे. (Goa Crime News)
सरकारकडून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्यात यश आलेले नाही. पोलिस तपासची टक्केवारी इतरांच्या तुलनेत गोव्यात सर्वाधिक असली तरी गुन्हे रोखण्यास पोलिस कमी पडत आहेत.
गेल्या 5 वर्षात दक्षिण गोव्यात झालेल्या गुन्ह्यांची नोंद पहिली असता असं दिसून येतं की परप्रांतीयांकडून दक्षिण गोव्यात 1152 गुन्हे झाले असून 158 गुन्हे झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी केले असल्याचे समोर आले आहे. 5 वर्षात दक्षिण गोव्यात झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे-
2018 साली परप्रांतीयांकडून 194 तर झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांकडून 24 गुन्हे झालेल्याची नोंद आहे.
2019 साली परप्रांतीयांकडून 213 तर झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांकडून 32 गुन्हे झालेल्याची नोंद आहे.
2020 साली परप्रांतीयांकडून 266 तर झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांकडून 59 गुन्हे झालेल्याची नोंद आहे.
2021 साली परप्रांतीयांकडून 214 तर झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांकडून 13 गुन्हे झालेल्याची नोंद आहे.
2022 साली परप्रांतीयांकडून 265 तर झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांकडून 30 गुन्हे झालेल्याची नोंद आहे.
वरील आकडेवारी पाहता परप्रांतीयांकडून झालेले एकूण गुन्हे 1152 तर झोपडपट्टीत राहणाऱ्यांकडून झालेल्या गुन्ह्यांचा आकडा 158 एवढा आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.