साकोर्डा,मोले परिसरात जाणवले भूकंपाचे सौम्‍य धक्के

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

साकोर्डा, मोले व कुळे - शिगाव पंचायत क्षेत्रात गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजण्‍याच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे जाणवल्याने लोक भयभीत झाले.

तांबडीसुर्ला  : साकोर्डा, मोले व कुळे - शिगाव पंचायत क्षेत्रात गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजण्‍याच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे जाणवल्याने लोक भयभीत झाले. तत्पूर्वी सुरुंगाचा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज लोकांनी ऐकला. त्यामुळे हा नक्की प्रकार काय? याबद्दल परिसरात चर्चेचा विषय बनलेला आहे.

साकोर्डा भागात भूकंपाचे धक्के बसल्यावर जमीन कंपत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आल्यावर ते सतर्क झाले. जमीन कंपत असल्याने घरातील कपाट, खिडक्यांची दारे, पत्रे, स्वयंपाक घरातील इतर सामग्रीच्‍या आवाजाने घरातील लोक सावध झाले. घराच्‍या टेरेसवर खुर्ची घेऊन निवांतपणे बसलेल्या लोकांची खुर्ची नकळतपणे कलंडली. मुरगे साकोर्डा येथे भूकंपाचा धक्का बसल्यावर खाटीवर झोपलेली एक व्यक्ती खाली कोसळली, तर कुळे येथील एका घरात झोपलेला मुलगा असाच खाली पडल्याने हा प्रकार भूकंपाचा असल्याचा अंदाज घरातील लोकांनी वर्तविला. देऊळमळ येथे भूकंपाचा तीव्र धक्का बसून एका घराच्या भिंतीला तडा गेल्याने घराचे नुकसान झाले. तांबडीसुर्ला, तयडे, बळकर्णे, देऊळमळ, सातपाल, मुरगे, नवे, साकोर्डा आदी गावातील लोकांना भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे जाणवले.

 

अधिक वाचा :

आज ‘विधिकार दिन’..‘भाषक वादा’ची ठिणगी आजही

संबंधित बातम्या