Goa Dairy : शेतकऱ्यांना लवकरच थकीत रक्कम खात्यात मिळणार; फळदेसाईंचं स्पष्टीकरण

दिवाळी आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे बँकेकडून ती शेतकऱ्यांच्या खात्यात जाण्यास विलंब झाला असल्याचंही फळदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे.
Goa Dairy
Goa Dairy Dainik Gomantak

Goa Dairy : दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागील देणी थकल्यामुळे नाराजीचं वातावरण होतं. दिवाळी उलटूनही थकित रक्कम न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. मात्र आता गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी मंगळवारी शेतकऱ्यांना चिंता न करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच शेतकऱ्यांची 2.5 कोटी रुपयांची थकीत रक्कम बँकेच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र दिवाळी आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे बँकेकडून ती शेतकऱ्यांच्या खात्यात जाण्यास विलंब झाला असल्याचंही फळदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

दिवाळी उलटूनही पैसे खात्यात जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी गोवा डेअरी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा सण आहे, मात्र आम्ही आमची थकीत देणी गोवा डेअरीकडून न मिळाल्यामुळे साजरा करु शकत नसल्याची खंत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना फळदेसाई म्हणाले की, थकीत रक्कम 1 ते 15 ऑक्टोबरमध्येच मंजूर करण्यात आली होती आणि बँक खात्यातही जमा करण्यात आली होती. मात्र बँकेला सुट्टी असल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास विलंब झाल्याचंही फळदेसाईंनी स्पष्ट केलं आहे.

Goa Dairy
Goa Dairy : दिवाळी उलटूनही गोवा डेअरीकडून थकबाकी नाहीच; दूध उत्पादकांमध्ये नाराजी

गोवा डेअरीच्या नूतन अध्यक्षांनी डेअरीचे हरवलेले वैभव परत मिळवून देण्याचे वचन दिले असतानाही, दिवाळीपर्यंतही त्यांची थकबाकी न मिळाल्याने दूध पुरवठा करणारे शेतकरी नाराज होते. दिवाळीचा सण सुरू झाला आहे आणि आमची प्रलंबित बिले गोवा डेअरीने मंजूर केली नसल्याने आम्ही तो साजरा करू शकत नाही, असं खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली होते.

आमची गुरे राखण्यासाठी आम्हाला खूप खर्च करावा लागतो आणि आम्हाला आशा होती की सणासुदीच्या हंगामात आमची थकबाकी भरली जाईल, परंतु आजपर्यंत आमच्या खात्यात एक पैसाही जमा झालेला नाही, असे सांगत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली होती.

महागाई आणि चाऱ्याच्या वाढत्या किमतींमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांवर बिलं थकल्याचा गंभीर परिणाम होत असून त्यामुळे व्यवसायात उत्पादनात घट झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com