Millet Farming : गोव्यात नाचणी-बाजरीच्या पिकासाठी कृषी विभाग प्रयत्नशील; कार्निव्हल फ्लोट परेडमधून देणार प्रोत्साहन

शेतकऱ्यांना लहान भागात बाजरीची लागवड करण्यास प्रोत्साहित केले जाईल
Millet Farming in Goa
Millet Farming in GoaDainik Gomantak

Millet Farming in Goa : सध्या सुपरफूडचा जमाना असला तरी गोव्याचा कृषी विभाग पौष्टिकतेने परिपूर्ण असलेल्या बाजरी, नाचणी आणि वरी अशा उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत आहे. याआधी बाजरीची लागवड तीन दशकांपूर्वी सुमारे 100 हेक्टर असताना, ती आता केवळ 20 हेक्टरच्या आसपास आहे.

गोव्यात बाजरी कधीच मोठ्या प्रमाणावर उगवली जात नसली तरी, आधारभूत किंमत आणि तुलनेने मोठ्या उत्पादनामुळे शेतकरी नंतर याकडे वळले. बाजरीला उच्च पोषक मूल्य असले तरी, सरकारने भाताला अधिक प्राधान्य आणि समर्थन दिल्याने बहुतेक शेतकरी भातशेतीकडे वळले, असे कृषी संचालक नेव्हिल अल्फोन्सो यांनी सांगितले.

Millet Farming in Goa
Murder Case: आधी खून केला, मग त्याच डॉक्टरच्या एटीएममधून काढले 60 हजार

2022 मध्ये, कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे 250 शेतकरी दोन प्रकारच्या बाजरी पिकवतात. ही लागवड पाच तालुक्यांतील डोंगराळ भागात केली जाते. यामध्ये काणकोण, पेडणे,केपे, सांगे आणि वाळपाई यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे गोव्यात 33,677 हेक्टरवर भाताचे पीक घेतले जाते.

अल्फोन्सो यांनी याआधी बाजरी शेतकर्‍यांसोबत काम केले होते. ते म्हणाले की, शेतकर्‍यांनी बाजरीचे उत्पादन घेणे सोडले कारण या उत्पादनाला अन्नधान्याच्या तुलनेत चांगली किंमत मिळत नव्हती. नवीन तंत्रज्ञानामुळे भाताचे उत्पादन हेक्टरी दोन मेट्रिक टनांवरून तीन मेट्रिक टनांवर गेले आणि आज एका शेतकऱ्याला हेक्टरी तीन मेट्रिक टन उत्पादनाची खात्री देता येते. मात्र बाजरी पिकवणाऱ्या शेतकऱ्याला हेक्टरी एक मेट्रिक टन उत्पादन मिळाल्यास तो स्वत:ला भाग्यवान समजू शकतो.

बाजरीकडून भात पिकाकडे जाणे अपरिहार्य होते, कारण यात एक तयार बाजारपेठ होती. आणि दुसरे कारण म्हणजे, तेव्हा लोकांनाही बाजरीच्या श्रेष्ठतेची जाणीव नव्हती. पेडणेमधील हस्सापूर येथील शेतकरी शुभांगी मलिक यांनी सांगितले की, त्यांच्याकडे सुमारे 900 चौरस मीटर जमीन बाजरी लागवडीखाली आहे तर उर्वरित जामीन भातशेतीसाठी आहे.

गोव्यात बाजरी लागवडीखाली बहुतांश शेतकऱ्यांचे क्षेत्र 500-1000 चौ.मी. इतकेच क्षेत्र आहे. कृषी विभागाला हे क्षेत्र वाढवायचे असले तरी, शेतकऱ्यांना लहान भागात बाजरीची लागवड करण्यास प्रोत्साहित केले जाईल, असे कृषी संचालकांनी सांगितले. त्यासाठी सवलतीच्या दरात बाजरी बियाणांची गुणवत्ता वाढवून उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी योजना तयार करण्यात येत आहे. चाचण्याही झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना त्यांच्या मालाला चांगली किंमत देण्याबरोबरच त्यांना तयार बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाईल. डोंगराळ नसलेल्या भागात बाजरीचे पीक घेता येईल का, यासाठी कृषी विभागाने चाचण्याही घेतल्या आहेत. बाजरीच्या सेंद्रिय शेतीवरही भर दिला जाईल, असे ते म्हणाले. मात्र बिगर सेंद्रिय बाजरी शेतीला नाउमेद केले जाणार नाही. बाजरी शेतीमध्ये यांत्रिकीकरण सुरू करून कृषी विभाग जूनपासून उत्पादन पद्धतीत येण्याच्या तयारीत आहे.

दुसरीकडे, विभागाने नाचणीपासून बनवलेल्या तीन स्थानिक पारंपारिक पदार्थांचा प्रचार करण्याबरोबरच बाजरीवर आधारित उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखल्या आहेत. गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सकडून नाचणी आधारित गोव्याच्या डिशेसच्या तपशीलासाठी मदत मागितली आहे.

लाडूपासून बिस्किटे आणि अगदी डार्क चॉकलेट्सपर्यंत विविध प्रकारचे नाचणी आधारित उत्पादने आज बाजारात उपलब्ध आहेत. बाजरीवर आधारित विविध उत्पादनांची विक्री करणाऱ्या ऊर्जाच्या संस्थापक स्नेहा भागवत म्हणाल्या की, हळूहळू नाचणी उत्पादनांसाठी बाजारपेठ रुंदावत आहे. आम्ही रागी चॉकलेटही विकतो. हे गडद चॉकलेटसारखे दिसते, त्याचा मुख्य घटक नाचणी आहे.

यावर अफॉन्सो म्हणाले की, ते नाचणीवर आधारित खाद्यपदार्थांना देखील प्रोत्साहन देतील कारण जास्त शेतकरी बाजरीपेक्षा नाचणीचे उत्पादन करतात. आम्ही स्वयं-मदत गटांना नाचणी खाण्यायोग्य पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देऊ आणि सरकारी बैठकांमध्ये दिल्या जाणार्‍या बिस्किटे आणि इतर स्नॅक्सची जागा नाचणीपासून बनवलेल्या खाण्यायोग्य पदार्थांना देऊ. बाजरीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभाग प्रथमच शनिवारी कार्निव्हल फ्लोट परेडमध्ये सहभागी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com