बार्देश बझारच्या उमेदवारांची मनधरणी

बाजार
बाजार


म्हापसा

 मरड म्हापसा येथील बार्देश बझार ग्राहक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवार २ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत अशी अंतिम मुदत असल्याने त्यानंतरच या निवडणुकीचे एकंदर चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी या संस्थेचे काही आजी व माजी संचालक सध्या अर्ज मागे घेण्यासाठी काही उमेदवारांची मनधरणी करीत आहेत.
सर्वसाधारण विभागातील १२ जागांसाठी जोसेफ कुटो, धर्मा चोडणकर, रघुवीर देसाई, रवींद्र फोगेरी, सखाराम गावकर, शशिकांत कांदोळकर, प्रमोद कर्पे, आश्‍विन खलप, निखिलचंद्र खलप, निर्मला खलप, एकनाथ नागवेकर, महादेव नाटेकर, विश्‍वास नायक, नारायण राठवड, चंद्रकांत शेटगावकर, गोकुळदास शिरोडकर, बापू तुयेकर असे १७ अर्ज ग्राह्य धरण्यात आले. या विभागात जयवंत नाईक, नितीन त्रिंबक नाईक, पवन जयवंत नाईक, सुरेश चोडणकर व तुळशीदास पेडणेकर अशा पाच जणांचे उमेदवारी अर्ज अग्राह्य ठरवण्यात आले.
महिला विभागातील दोन जागांसाठी निर्मला रमाकांत खलप, पूनम नाईक व शिवानी विश्‍वास नाईक अशा तीन उमेदवारांचे अर्ज ग्राह्य ठरले, तर रजनी धर्मा चोडणकर यांचा अर्ज अग्राह्य ठरवण्यात आला.
या निवडणुकीसाठी पांडुरंग बी. नाईक हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी २ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत अशी अंतिम मुदत देण्यात आली आहे. ३ रोजी उमेदवारांना चिन्हे देण्यात येतील व त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. दरम्यान, या निवडणुकीच्या मतदानाची तारीख सरकारने अद्याप जाहीर केली नाही.
खलप गटातील सखाराम गावकर, निखिलचंद्र खलप व निर्मला खलप असे तीन उमेदवार तसेच जयवंत नाईक गटातील असल्याचे मानले जाणारे प्रमोद कर्पे व बापू तुयेकर असे दोन उमेदवार असे मिळून एकूण पाच उमेदवार स्वत:चे अर्ज मागे घेण्याची शक्‍यता आहे. निवडणूक टाळण्यासाठी सर्वसाधारण विभागातून किमान पाच उमेवारी अर्ज, तर महिला विभागातून किमान एक अर्ज मागे घेणे अत्यावश्‍यक आहे. अनुसूचित जाती जमाती विभागातील एका जागेसाठी कुणाचाही उमेदवार पात्र नसल्याने त्या विभागासाठी निवडणूक होणार नाही, हे आता स्पष्टच झाले आहे.

GOA GOA

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com