खाणपट्ट्यांची नोंदणी 2037 पर्यंत नाहीच

ॲड. देवीदास पांगम यांचा गोवा खंडपीठात दावा
Mines in Goa
Mines in Goa Dainik Gomantak

पणजी : खाणपट्ट्यांची नोंदणी 1961 पासून केल्याने तेव्हापासून 50 वर्षे मुदतवाढ गृहित धरायला हवी तर 1987 पासून नव्हे. त्यामुळे ही मुदत 2037 पर्यंत असूच शकत नाही, असा युक्तिवाद ॲडव्होकेट जनरल पांगम यांनी केला. खाणपट्ट्यांचा ताबा सुपूर्द करण्याबाबत सरकारविरोधात 30 हून अधिक खाण कंपन्यांनी गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. यावेळी पांगम यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली.

ते म्हणाले की, राज्यातील खाणपट्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा, दमण व दीव खाण कन्सेशन (अबोलिशन व डिक्लेरेशन एस मायनिंग लिजीस) कायदा 1987 करण्यात आला होता. हे खाणपट्टे 1987 नव्हे तर 1961 मध्ये नोंदवण्यात आले आहेत. खाणपट्ट्यांचे नुतनीकरण म्हणजे नव्याने खाणपट्ट्यांना मंजुरी देणे असा अर्थ लावण्यात आला आहे तो चुकीचा आहे. गोवा, दमण व दीव खाण कन्सेशन (अबोलिशन व डिक्लेरेशन एस मायनिंग लिजीस) कायदा 1987 चा या एमएमडीआर कायदाशी संबंध नाही त्यामुळे या खाणपट्ट्यांशाठी मुदत वाढवून देता येत नाही. खाणपट्ट्यांची नोंदणी 1961 पासून केल्याने तेव्हापासून 50 वर्षे मुदतवाढ गृहित धरायला हवी तर 1987 पासून नव्हे. त्यामुळे ही मुदत 2037 पर्यंत असूच शकत नाही, असा पांगम यांनी युक्तिवाद केला.

Mines in Goa
गाडीने जाणे टाळल्याने हेल्टन बचावला!

खाणपट्ट्यांचे नुतनीकरण म्हणजे नव्याने परवानगी देणे होय. ज्या खाणपट्ट्यांची मुदत 31 मार्चपर्यंत आहे किंवा नुतनीकरणाची मुदत संपेपर्यंत किंवा जेव्हापासून खाणपट्ट्यांना मंजुरी देण्यात आली आहे ते 50 वर्षांपर्यंत परवानगी देण्यात आली आहे त्या सुरू राहतील. त्यामुळे नुतनीकरण व मंजुरी हे शब्द कायद्यानुसार वेगवेगळ्या अर्थाने घेण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाने गोवा फाऊंडेशनच्या निवाड्यात खाणपट्ट्यांच्या नुतनीकरण व मंजुरी याबाबत स्पष्टोक्ती दिली आहे. त्याची अंमलबजावणी करणे सरकारला बंधनकारक आहे. त्यामुळे याचिकादारांची विनंती मान्य न करता त्या फेटाळण्यात याव्यात अशी बाजू पांगम यांनी मांडली.

राज्यात खाणपट्ट्या सुरू असताना त्या कायद्यानुसार खनिज उत्खनन करत होता असा दावा एकाही खाणपट्ट्याच्या याचिकादारांनी केलेला नाही. त्यांच्याकडे पर्यावरण परवाना नव्हता तरी बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू होते. खाणी सुरू ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेले कोणतेच परवाने त्यांच्याकडे नव्हते. काहींनी या खाणपट्ट्या भाडेपट्टीवर दिल्या होत्या तर काहींनी असलेली थकबाकीही जमा केली नव्हती, असे पांगम यांनी न्यायालयात म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com