मडगावात मिनी कॅसिनोवर धाड, 9 जणांना अटक

भर बाजारात हा जुगार अड्डा सुरू होता
मडगावात मिनी कॅसिनोवर धाड, 9 जणांना अटक
Mini casino raid in Margao 9 arrestedDainik Gomantak

मडगाव : मडगाव रेल्वे उड्डाण पुलाखाली एका आलिशान दुकानात चालू असलेल्या एका मिनी कॅसिनोवर मडगाव पोलिसांनी धाड घालून 9 जणांना अटक केली. भर बाजारात हा जुगार अड्डा चालू असूनही त्याकडे एवढे दिवस पोलिसांचे लक्ष गेले नव्हते. मात्र आज केलेल्या धडक कारवाईत सुमारे अडीच लाखांचा माल पकडला गेला आहे. (Mini casino raid in Margao)

उड्डाण पुलाजवळ असलेल्या गोवा गेस्ट हाऊसच्या खाली असलेल्या एका एसी दुकानात हा अड्डा चालू होता. मात्र बाहेरून त्याचा काही पत्ता लागत नव्हता. आज सायंकाळी माडगावचे पोलिस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली मडगाव पोलिसांनी ही कारवाई केली.

Mini casino raid in Margao 9 arrested
मडगाव नगरपालिकेतील मजुरांचा कामावर जाण्यास नकार

यावेळी या अड्ड्यावर सातजण जुगार खेळण्यासाठी आले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याबरोबरच हा केसिनो चालवणाऱ्या दोन ऑपरेटरांनाही अटक केली आहे. पोलिसांनी या अड्ड्यातून 10 संगणक आणि रोख असा सुमारे अडीच लाखांचा माल जप्त केला आहे. कोणा बंटी नावाचा व्यावसायिक हा अड्डा चालवीत होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. यापूर्वी माडगावात गांधी मार्केट परिसरात असाच मिनी केसिनो अड्डा चालू होता. त्यावरही यापूर्वी मडगाव पोलिसांनी कारवाई केली होती.या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. तसेच या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.