माजोर्डा येथे ‘दमदार मिनी ट्रॅक्टर’ बाजारात सादर

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

शेतकऱ्यांना 360 डिग्री शेती करण्यास मिळावी, शेती फायदेशीर बनविण्यासाठी मिनी ट्रॅक्टरचे प्रणेते कॅप्टन ट्रॅक्टर यांनी भारतात आठव्या जनरेशनचा (8 जी) दमदार मिनी ट्रॅक्टर माजोर्डा येथील अलीला दिवा रिसॉर्टमध्ये लॉन्च केला.

सासष्टी: शेतकऱ्यांना 360 डिग्री शेती करण्यास मिळावी, शेती फायदेशीर बनविण्यासाठी मिनी ट्रॅक्टरचे प्रणेते कॅप्टन ट्रॅक्टर यांनी भारतात आठव्या जनरेशनचा (8 जी) दमदार मिनी ट्रॅक्टर माजोर्डा येथील अलीला दिवा रिसॉर्टमध्ये लॉन्च केला. यावेळी कॅप्टन ट्रॅक्टरचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पटेल, संचालक कैलास मोवालीया, नयन मोवालीया, शैलेश मोवालीया उपस्थित होते. (Mini Tractor launch by Captain Tractor in Majorda goa )

मिनी ट्रॅक्टर ताकदवान व ऐटबाज सिंहापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला असून शेतीजमीन तयार करण्यापासून ते काढणीपर्यंतची कामे करण्यास हा ट्रॅक्टर सक्षम आहे. या ट्रॅक्टरने केवळ शेतकरीच नाही तर संपूर्ण वाहन, ऑटोमोबाईल आणि कृषी क्षेत्राशी जोडलेले लोकांमध्ये स्वतःची क्रेझ निर्माण केली आहे. हा ट्रॅक्टर शक्तिशाली तीन सिलिंडर इंजिनने बनलेला आहे. आवाज कमी व दमदार काम अशी पद्धतीने हा ट्रॅक्टर डिझाईन करण्यात आला आहे. ओईएमच्या जागतिक मानक घटकांद्वारे समृद्ध केलेल्या या ट्रॅक्टरला सुरक्षेबरोबर आधुनिक लुकही देण्यात आला आहे. या ट्रॅक्टरचा प्रोजेक्टर लॅंप, क्रोमियम गार्निश. तीन सिलिंडर इंजिन, साईड शिफ्ट गिअर्स. 9 फॉरवर्ड व 3 रिव्हर्स गिअर ट्रान्समिशन, लार्ज लेगरूम, फेन्डर हँडल,पूल टाईप पार्किंग ब्रेक ओआयएम, उच्च, मध्यम आणि कमी गतीचा पर्याय, स्मार्ट एडीडीसी डबल लिव्हर हायड्रॉलिक, 750 किलो वजन उचलण्याची क्षमता, एलईडी लॅंप, हायड्रोस्टेटिक पॉवर स्टीयरिंग, शॉर्ट टर्निंग रेडियस, आरामदायक आसन ही या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये आहेत. 

महाराष्ट्र आणि गोव्यात रेती पुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय 

सर्वोत्कृष्ट शेती (Agriculture) आणि ड्रायव्हिंगच्या (Driving) अनुभवासाठी विकसित केलेला हा ट्रॅक्टर (Tractor) असून हा नाविन्यपूर्ण ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणेल. भविष्यातही आम्ही शेतकरी व शेतीच्या उत्कर्षासाठी नवनवीन प्रयोग करू, असे कॅप्टन ट्रॅक्टरचे (Captain Tractor) व्यवस्थापकीय संचालक राजेश पटेल यांनी सांगितले. (Goa)

संबंधित बातम्या