तृणमूल काँग्रेसकडे खाणसम्राटही आकर्षित!

साहजिकच तृणमूलच्या (Trinamool Congress) या आश्वासनाकडे त्याच नजरेतून पाहिले जात आहे. आता तर गोव्यातील (Goa) एका खाणसम्राटानेच तृणमूलसाठी आपली तिजोरी खुली केल्याची चर्चा आहे.
तृणमूल काँग्रेसकडे खाणसम्राटही आकर्षित!
तृणमूलच्या (Trinamool Congress) खाण मालकांच्या आश्वासनाकडे त्याच नजरेतून पाहिले जात आहे.Dainik Gomantak

गोव्यात (Goa) सत्तेवर आलो तर खाण महामंडळ स्थापन करून खाणींची मालकी जनतेकडे देण्याची घोषणा तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) गेले काही महिने तेच पालुपद लावत आहेत. 2012 पासून भाजप गोव्यात सत्तेवर आहे, पण खाण प्रश्न सोडविण्यासाठी या सरकारने गांभीर्याने पावले उचलल्याचे दिसत नाही. त्यामुळे सत्तेवर कोणीही आला तरी खरेच तो पक्ष खाणी सुरू करणार काय, याबाबत निदान खाण अवलंबितांमध्‍ये तरी संशयच आहे. साहजिकच तृणमूलच्या या आश्वासनाकडे त्याच नजरेतून पाहिले जात आहे. आता तर गोव्यातील एका खाणसम्राटानेच तृणमूलसाठी आपली तिजोरी खुली केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संशयाला आणखी बळकटी मिळाली आहे.

तृणमूलच्या (Trinamool Congress) खाण मालकांच्या आश्वासनाकडे त्याच नजरेतून पाहिले जात आहे.
...तर तृणमूल पक्षाकडून मुख्यमंत्रीपदी महिला!

देशात भाजपला पर्याय लोक शोधत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या रूपाने लोकांना तो पर्याय दिसत आहे. मतदारांना निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने दाखवण्याचे काम भाजप सरकार करत आले आहे. महिन्याला दोन हजार रुपये बेकारी भत्ता मिळणार, अशी आमिषे दाखवून लोकांची मते मागितली जात आहेत. प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये येणार अशी आश्वासने दिली. मात्र पैसे आलेच नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com