शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी काहीच केले नाही

प्रतिनिधी
रविवार, 30 ऑगस्ट 2020

राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राची खालावलेली स्थिती पाहिल्यास राज्याचे शिक्षणमंत्री नसल्याचे वाटते. शैक्षणिक क्षेत्रात सध्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यासाठी, परीक्षेच्या शुल्कासंबंधी अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या चर्चा करून सोडविणे गरजेचे आहे, परंतु याप्रकरणी तसे होत नसल्याचा असा आरोप आपचे निमंत्रक एल्विस गोम्स यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

सासष्टी: राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राची खालावलेली स्थिती पाहिल्यास राज्याचे शिक्षणमंत्री नसल्याचे वाटते. शैक्षणिक क्षेत्रात सध्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यासाठी, परीक्षेच्या शुल्कासंबंधी अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या चर्चा करून सोडविणे गरजेचे आहे, परंतु याप्रकरणी तसे होत नसल्याचा असा आरोप आपचे निमंत्रक एल्विस गोम्स यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

सध्या राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील स्कुलिंग, परिक्षा शुल्क आदी महत्त्वाच्या विषयांत अनेक समस्या विद्यार्थी तसेच पालकांना भेडसावत  असून या समस्याचे लवकरात लवकर चर्चा करून निवारण करणे गरजेचे आहे. पण, सध्या शिक्षणमंत्रीच बेपत्ता झाल्याचे दिसून येत असून त्यांना शोधण्यासाठी आप पक्ष लवकरच लूक आऊट नोटीस जारी करणार आहे अशी टीका एल्विस गोम्स यांनी केली. लोकांच्या हिताचे सरकार असते तर यावर त्वरित चर्चा करून तोडगा काढण्यात आला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अनेक समस्या असूनही सरकारने अद्याप कोणताही प्रश्न सोडविण्याची इच्छा दर्शविलेली नाही. यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक केली असती तर गोव्याला शिक्षणमंत्री आहेत जे विद्यार्थी आणि सर्व संबंधितांची काळजी घेतात हे सिद्ध झाले असते, असे एल्विस गोम्स यांनी सांगितले. यावेळी सिद्धार्थ कारपूरकर उपस्थित होते.

goa

संबंधित बातम्या