Mauvin Godinho: जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच प्रशासन तुमच्या दारी उपक्रम

वाळपईत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या बैठकीला चांगला प्रतिसाद
Mauvin Godinho
Mauvin GodinhoDainik Gomantak

Mauvin Godinho: भाजप सरकाने जनतेचे प्रश्न ऐकून सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रशासन तुमच्या दारी उपक्रम राबविला जात आहे. माझ्याकडे उद्योग, वाहतुक, पंचायत खाते असुन ह्या खात्याच्या माध्यमातुन जनेतेचे प्रश्न सोडविण्याचे सवोतोपरी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रशासन तुमच्या दारी हा उपक्रमात ते बोलत होते.

Mauvin Godinho
ISL Final: उद्या मेगा फायनल! आयएसएल करंडकासाठी फातोर्ड्यात बंगळूर एफसी, एटीके मोहन बागान भिडणार

राज्यातील सावंत सरकारच्या 4 वर्षपुर्तीनिमित्त तर केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पुर्ण होत असल्याने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे प्रमुख उपस्थित होत्या.

मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, सत्तरीच्या तळातळात सरकारच्या विविध योजना पोहचल्या पाहिजे. उद्योगधंद्याच्या माध्यमातून प्रत्येकांनी आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण बनले पाहिजे. पंचायतीत जर योग्य ठिकाणी जागा उपलब्ध झाली तर नवीन लहान मोठी इंडस्ट्रीज आणण्याचा आपला प्रयत्न असेल.

पंचायत पातळीवर जनतेची कामे वेळेवेर झाली पाहिजेत. गोव्यात तीनशे नवीन इलेक्ट्रीक बसेस आणणार आहे. सरकार खाजगी बसेस भाड्याने घेऊन चालविणार आहे, असेही ते म्हणाले.

Mauvin Godinho
Babush Monserrate: 'तो' खटला महिला न्यायाधीशांच्या न्यायालयात चालणार?

भिरोंडा, पिसुर्ले, म्हाऊस, होंडा आदी गावातील सरपंचांनी समस्या मांडल्या. मंत्री गुदिन्हो यांनी लवकरच सर्व समस्यांवर तोंडगा काढू व उपाय योजना झाल्यानंतर दुसरी बैठक बोलावून सविस्तर चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले. इंडस्ट्री ट्रेड आणि कॉमर्सच्या संचालक श्वेतीका सचान यांनीही मार्गदर्शन केले.

आमदार दिव्या राणे म्हणाल्या, सत्तरीच्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सरकाने योग्य माणसाची नेमणूक केली आहे. आज झालेल्या मार्गदर्शन व चर्चेवेळी ते दिसून आले. सत्तरीची जनता वेळोवेळी एकमेकांबरोबर असुन समस्या असो वा इतर कार्य मिळुन-मिसळून करते.

सत्तरीत यापुर्वी मंत्री निलेश काब्राल प्रशासन तुमच्या दारी उपक्रमात सामील झाले होते. गुदिन्हो यांच्या बैठकीलाही प्रतिसाद चांगला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com