Goa Tourism: पर्यटनक्षेत्र सशर्त खुले व्‍हावे; मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले मत

Goa Tourism: पर्यटनक्षेत्र सशर्त खुले व्‍हावे; मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले मत
michael lobo grunge.jpg

पणजी: पर्यटनक्षेत्र (Tourism) रोजगार देणारा मोठा उद्योग आहे. त्यामुळे अमर्याद काळासाठी पर्यटन बंद ठेवता येणार नाही. कोविड प्रतिबंधात्मक (Covid-19 Vaccine) दोन्ही लसी घेतलेल्या किंवा कोविड नसल्याचे वैध प्रमाणपत्र आणणाऱ्या पर्यटकांना प्रवेश देऊन पर्यटन क्षेत्र खुले करता येईल, असे मत ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो (Micheal lobo) यांनी व्यक्त केले. (Minister Michael Lobo expressed the view that the tourism sector should be opened conditionally)

त्यांनी सांगितले, याविषयावर मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant)  यांची भेट घेणार आहे. पर्यटन क्षेत्र म्हणजे केवळ हॉटेल्स नव्हेत, पर्यटन क्षेत्रावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेले अनेकजण आहेत. कोविड महामारीच्या काळात त्यांना आर्थिक संकट सर्वांवर कोसळल्याने त्यांना आधार दिला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने संचारबंदी मागे घेणे सुरू केले आहे.

दरम्यान, राज्यातील प्रत्येक नागरिकाने कोविड प्रतिबंधात्मक लसीची एकतरी मात्रा घेईपर्यंत पर्यटन क्षेत्र खुले करता येणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. विविध घटकांकडून पर्यटन क्षेत्र खुले करण्याविषयी मागण्या वाढू लागल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यावर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री म्हणाले, अर्थचक्रही महत्त्‍वाचे आहे, पण त्याहून अधिक महत्त्‍वाचे जनतेचे आरोग्य आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com