मंत्री मायकल लोबो बेजबाबदार व्यक्तव्य करण्यासाठी ‘कुप्रसिद्ध’: जयेश साळगावकर

Minister Michael Lobo is infamous for controversial statements
Minister Michael Lobo is infamous for controversial statements

पणजी :  ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो हे जनतेची दिशाभूल करण्यासाठी मी भाजपमध्ये येणार अशा वावड्या अधूनमधून उठवत असतात. ते अशी बेजबाबदार वक्तव्य करण्यासाठी आता कुप्रसिद्ध ठरत आहेत, अशी टीका साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, पत्रकारांनी राज्यातील रस्त्याविषयी प्रश्न विचारल्यावर लोबो हे साळगावातील रस्त्यावर का घसरले हे उघड आहे. भात कापणी यंत्रे का कमी आहेत, असे विचारल्यावर साळगावच्या आमदाराने भात कापणी यंत्रे आणायला हवी होती असे ते म्हणाले. साळगाव मतदारसंघात १२ भात कापणी यंत्रे होती तर कळंगुटमध्ये चार यंत्रे होती. कळंगुटमध्ये भूरुपांतर जोरात सुरू आहे. खारफुटी कापून भूखंड विकसित केले जात आहेत. साळगावच्या रस्त्यावरील खड्ड्यांत ते पडण्यापूर्वी कळंगुटमधील रस्त्यावरील खडड्यांत ते पडतील याची काळजी त्यानी करावी.

मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटलो हे खरे आहे. दोनवेळा आमची भेट झाली. पण, ती भेट साळगाव मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी होती. याव्यतिरीक्त भाजपच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांना मी भेटलो तर त्याचे पुरावे लोबो यांनी सादर करावेत. उगाच बेताल बडबड करून ते सर्वांची करमणूक करत आहेत. त्यांना आता कोणी गांभीर्याने घेत नाहीत. मीही भात कापणी यंत्रावरून त्यांनी मारलेल्या टोमण्यांना उत्तर दिले नव्हते. पण, आता पुन्हा नेटाने ते मी भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहे असे सांगू लागले आहेत. एकच गोष्ट अनेकदा सांगितल्याने ती खरी वाटू शकते म्हणून मी आज खुलासा करण्याचा निर्णय घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com