Sanjivini Sugar Factory: ‘संजीवनी’ला आता मिळणार उर्जितावस्था

केंद्रीय मंत्री ज्योती यांची मदतीची ग्वाही
Sanjivini Sugar Factory
Sanjivini Sugar FactoryDainik Gomantak

पणजी : राज्यातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्यासाठी (Sanjivini Sugar Factory, Goa) केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती (Sadhvi Niranjan Jyoti) यांनी आज केली.

शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे ८० वे वार्षिक अधिवेशन आणि शुगर एक्स्पोच्या डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील उदघाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) उपस्थित होते.

मंत्री साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या, साखर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडत आहेत. यासाठी केंद्र सरकारने इंधनामध्ये इथेनॉलचा वाढवलेला वापर आणि केंद्र सरकारकडून केली जाणारी मदत कारणीभूत आहे. २०१४ च्या तुलनेत आज साखर उद्योग अधिक विकसित झाला आहे. यापूर्वी साखरेची आयात करावी लागत होती. आता आपण निर्यातीपर्यंत पोचलो आहे.

याशिवाय साखर उद्योगांना अन्य पूरक व्यवसायांशी जोडले आहे. देश या उद्योगात स्वावलंबी होण्याच्या मार्गावर आहे. गोव्यात साखर उद्योग मोठा नसला तरी जो साखर कारखाना सध्या कार्यरत आहे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक ती सर्व मदत केंद्र सरकारकडून केली जाईल.

Sanjivini Sugar Factory
Goa Accident : कार नाल्यात कोसळून भीषण अपघात; चौघांना वाचवलं

यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर बनण्याची क्षमता आहे. या उद्योगात एके काळचा आयातदार भारत निर्यातदार झाला आहे. तरुणांचा सहभाग, नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनामुळे साखर उद्योगात उत्साह आणि नावीन्यपूर्णता वाढीला लागली आहे. या कार्यक्रमांमध्ये साखर उद्योगात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारचे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव सुधांशू पांडे, राजीव पुरी, संजय अवस्थी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शिवाजीराव देशमुख, माजी खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

इथेनॉल प्रकल्पात होणार रूपांतर

संजीवनी साखर कारखान्याचे इथेनॉल प्रकल्पामध्ये रूपांतर करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मदत घेणार आहोत. यासंदर्भातील निविदा लवकरच काढण्यात येणार आहेत. हा प्रकल्प सरकारच्या मदतीवर सुरू होता. आता त्याचे इथेनॉल प्रकल्पात रूपांतर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com