Rohan Khaunte: जेट्टी धोरणासाठीच्या सूचनांचा विचार करु; काँग्रेस, गोवा फॉरवर्डचा विरोध कायम

सामाजिक संस्था, विरोधी पक्ष आणि विचारवंतांसह शेकडो नागरिकांनी केला जेट्टी धोरणाला विरोध
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

Jetty Policy in Goa: गोवा सरकारच्या जेटी धोरणाचा विरोध वाढतच आहे. याबाबत विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी जेटी धोरण समितीवर तज्ज्ञ नाहीत, नद्यांची क्षमतांबद्दल काही माहिती नाही. त्यामुळे उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी हे धोरण असल्याचे म्हटलं आहे. अशी भुमिका गोवा फॉरवर्डने घेतली आहे. यावरुन आज पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी विरोधकांशीही बोलणार असल्याचं म्हटलं आहे.

(minister Rohan Khaunte say We will consider suggestions for Jetty Policy)

Rohan Khaunte
Goa Mega Job Fair: गोव्यात 8 नोव्हेंबर रोजी मेगा जॉब फेयरचे आयोजन

मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस, गोवा फाॅरवर्ड, काही सामाजिक संस्था यांनी या धोरणाला विरोध केला असल्याने याची दखल घेत पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, काही लोक विरोध करावा म्हणून करत आहेत. तर काही सौदेबाजी करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Rohan Khaunte
Mopa Airport: मोपा नामकरण बाबतीत आमदारांचे मौन आश्‍चर्यकारक!

गोवा सरकार जेट्टी धोरणासाठी आलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल आणि याबद्दल विरोधी पक्षांचे ही काय मत आहे. हे जाणून घेणार असल्याचं खंवटे यांनी म्हटले आहे. त्यामूळे हा मुद्दा आता निकालात निघणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

जेटी धोरणाबाब राज्यात नेमकी काय आहे स्थिती ?

वादग्रस्त ठरलेल्या जेटी धोरणाला गोवा राज्यात तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, विरोधी पक्ष आणि विचारवंतांसह शेकडो नागरिकांनी पणजीतील आझाद मैदानावर धोरण 31 ऑक्टोबर रोजी धडक मोर्चा काढत ते रद्द करण्याची मागणी केली गेली.

जेटी धोरणाच्या नावाआड कोळसा वाहतूक आणि किनारे संपवण्याचा कट सरकारकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच ‘नद्यांसाठी एकजूट’चा नारा देत जेटी धोरणाचा मसुदा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. यावर तोडगा काढण्यासाठी गोवा सरकारने आता तडजोडीची भुमिका घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com