संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना गोवा मेडिकल कॉलेजमधून डिस्चार्ज

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात तून घरी पाठवण्यात आले आहे .

पणजी : संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात तून घरी पाठवण्यात आले आहे . गेले दीड महिना त्यांच्यावर या इस्पितळात उपचार सुरू होते . कर्नाटकातील अंकोलाजवळ कार उलटून झालेल्या अपघातात नाईक जबर जखमी झाले होते .अनेक ठिकाणी त्यांना फॅक्चर झाले होते. अपघातानंतर काही तासांतच त्यांना गोव्यात उपचारासाठी हलविण्यात आले होते.

गोव्यातील टॅक्सी चालकांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे कूच; भेटीच्या मगणीवर ठाम

सुरुवातीचे काही दिवस अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर खास कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज घरी पाठवल्यानंतर त्यांनी आपल्याला किमान पुढील महिनाभर घरातच विश्रांती घ्यावी लागणार आहे असे सांगितले आहे.11 जानेवारीला कर्नाटक दौऱ्यावरून येल्लापूरहून गोकर्णला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 
 

गोवा नगरपालिका प्रभाग आरक्षणावर निडणूक आयोगाने दिलं न्यायालयाला उत्तर

 

संबंधित बातम्या