गोवा वन खात्याचा बेपत्ता वनरक्षक योगेश वेळीप महाराष्ट्रात सापडला
Missing forest ranger from Goa Yogesh Velip found in Maharashtra

गोवा वन खात्याचा बेपत्ता वनरक्षक योगेश वेळीप महाराष्ट्रात सापडला

पणजी :  गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेला वन खात्याचा वनरक्षक योगेश वेळीप हा पंढरपूर (महाराष्ट्र) येथे सापडला आहे. काणकोणचे पोलिसाचे पथक त्याला आणण्यासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. योगेश हा बेपत्ता झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून वन खात्याचे कर्मचारी तसेच स्थानिक लोकांनी तेथील जंगल पिंजून काढले होते.

काल संध्याकाळपर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यामुळे आज पुन्हा सकाळी ही शोध मोहीम सुरू करण्यापूर्वीच गोवा पोलिस खात्याने शेजारील राज्यांमध्ये पोलिस नेटवर्कचा वापर करून त्याचा शोध लावण्यात यश मिळवले आहे. ही माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकज कुमार यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com