गोव्यातली बेपत्ता अल्पवयीन मुलगी सापडली उत्तरप्रदेशात..

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

बाणावली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांच्या घरी उत्तर प्रदेशाला सापडली. त्‍यामुळे तिच्या कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला.

सासष्टी : बाणावली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांच्या घरी उत्तर प्रदेशाला सापडली. त्‍यामुळे तिच्या कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी उत्तर प्रदेश येथे मूळ गावी राहत होती तर महिनाभरापूर्वीच ती गोव्यात पालकांसोबत राहायला आली होती. मंगळवारी ही मुलगी घरी न सांगताच नातेवाईकांसह पुन्हा उत्तर प्रदेशाला रवाना झाली आणि काही गैरसमजामुळे तिच्या वडिलांना आपल्या मुलीचे अपहरण झाल्याचे वाटले व त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली. पोलिसात तक्रार नोंद केल्यावर पोलिसांनी त्वरित गोव्यातील सर्व पोलिस स्थानकात अपहरणाची माहिती दिली. त्यानुसार ही मुलगी तक्रारीच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशाला असल्याचे कळले. 
सध्या तिला उत्तर प्रदेशमधून बाणावली येथे पालकांचा घरी आणण्यात येत आहे.

 

अधिक वाचा :

आज ‘विधिकार दिन’..‘भाषक वादा’ची ठिणगी आजही 

संबंधित बातम्या