अपघातानंतर 11 दिवसांनी सापडला विमानाच्या कमांडरचा मृतदेह

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

अपघातग्रस्त झालेल्या मिग-२९के चे पायलट निशांत सिंग यांचा मृतदेह शोधून काढण्यात नौदलाला यश आले आहे. गोव्यातील समु्द्रात सुमारे ३० किमी दूर आणि ७० फूट खोल पाण्यात त्यांचा मृतदेह सापडला. 

पणजी- दहा दिवसांपूर्वी अपघातग्रस्त झालेल्या मिग-२९के चे पायलट निशांत सिंग यांचा मृतदेह शोधून काढण्यात नौदलाला यश आले आहे. गोव्यातील समु्द्रात सुमारे ३० किमी दूर आणि ७० फूट खोल पाण्यात त्यांचा मृतदेह सापडला. 

नौदलाच्या प्रोटोकॉलनुसार  सर्व सोपस्कार पार पाडण्यात येणार असून मृत केडरच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच मृतदेहाची डीएनए चाचणीही घेण्यात आली असून याद्वारे मृतदेह निशांत यांचाच असल्याची खात्री झाली आहे.     

 मागील महिन्याच्या २६ तारखेला हे विमान अरेबिक समु्द्रावर घिरट्या घालताना अपघातग्रस्त झाले होते. रशियन बनावटीचे हे विमान आयएनएस विक्रमादित्य एअरक्राफ्ट कॅरिअरमधून निघाल्यावर 26 नोव्हेंबर रोजी कोसळले. केडर निशांत यांचे विमान भरकटल्याने ते गेले काही दिवस गायब होते. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी तातडीने मोहिमा राबवण्यात आल्या. निशांत यांचा शोध घेण्यासाठी नौदलाने  एक एअरकाफ्ट 24 तास तैनात करून ठेवले होते. 29 नोव्हेंबरला नौदलाला मिग 29के चे काही अवशेष शोधून काढण्यात यश आले. मात्र, पायलट निशांत सिंग यांचा तपास काही केल्या लागत नव्हता. त्यानंतर समुद्रातही 9 वॉरशिप पाठवून शोध मोहिम राबवण्यात आली. समुद्राच्या खोलीतही सी मॅपिंग यंत्रणेचा आधार घेऊन तपास करण्यात आला. अखेर निशांत यांचा मृतदेह शोधून काढण्यात नौदलाला यश आले.   
 

संबंधित बातम्या