Mission Goa Election: चिदंबरम परतले, केजरीवाल, फडणवीसही आले

राष्ट्रीय नेत्यांच्या रणनीतीकडे राजकीय विश्लेषकांचे आणि गोवा जनतेचेही लक्ष
Mission Goa Election: National Leaders in goa
Mission Goa Election: National Leaders in goaDainik Gomantak

पणजी: राज्यात (Goa) आमदारांची पळवापळवी, फोडाफोडीची प्रकरणे तसेच त्यांना आमिषे दाखविण्याचे प्रकारही राष्ट्रीय पक्षांकडून सुरू झाले आहेत. आगामी निवडणूक (Goa Election) ही भाजपसाठी (BJP) प्रतिष्ठेची बनली असल्याने राष्ट्रीय नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच ‘आप’ चे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे दोन दिवशीय भेटीवर येत आहेत. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) हे सुद्धा दोन दिवस गोव्यात (Goa) होते त्यामुळे या राष्ट्रीय नेत्यांच्या रणनीतीकडे राजकीय विश्लेषकांचे आणि जनतेचेही लक्ष लागले आहे.

राज्यात निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून विविध राजकीय नेत्यांचे गोव्यातील दौरेही वाढत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस गोव्यातील राजकारणाला ऊत आला आहे. निवडणूक व्यूहरचना व रणनितीमधील भाजप व ‘आप’चे दिग्गज नेते गोव्यात असून मतदारांची मने आपल्याकडे वळवण्यासाठी ते आपापल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच पक्षाचे नेते तसेच पदाधिकाऱ्यांमार्फत निवडणुकीची तयारी व रणनिती यावर गोव्यातील या भेटीत अधिक भर देणार आहेत.

Mission Goa Election: National Leaders in goa
Goa Vaccination: लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी परप्रांतीय मजूरांची तोबा गर्दी

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम

काँग्रेसचे मुख्य निवडणूक निरीक्षक व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम हे दोन दिवसांच्या भेटीनंतर काल रोजी संध्याकाळी गोव्यातून परतले. दोन दिवशीय गोवा भेटीत चिदंबरम यांनी काँग्रेसच्या गट अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. गटाध्यक्षांना उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत त्यांनी दिल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजी असल्याने त्यावर पांघरूण घालण्यासाठी चिदंबरम हे महिन्याभरात तीनदा आले आहेत. राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांतील माजी आमदार तसेच नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे.

‘सरकार तुमच्या दारी’ला प्रतिसाद

राज्यात आजपासून ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमाला सुरुवात होऊन त्याला चांगला प्रतिसाद लाभला. सुमारे 3 ते 4 हजार लोकांनी थिवी येथे आयोजित या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी 1613 लोकांच्या समस्या व प्रश्‍न विविध खात्याच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष सोडवण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्य सचिवांपासून इतर खात्याचे सचिवही दिवसभर उपस्थित होते, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

Mission Goa Election: National Leaders in goa
Goa Assembly Elections: भाजपकडून सावंतच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

आपमुळे भाजपच्या रणनीतीत बदल

‘आप’ने राज्य सरकारला चांगलेच वेठीस धरले आहे. मोठमोठ्या घोषणा करून सरकारला नाकीनऊ आणल्याने भाजपला रणनीती बदलावी लागली आहे. वीज मोफत देण्याची घोषणा ‘आप’ ने जाहीर केल्यावर भाजप सरकारला 16 घनमीटर पाणी मोफत देण्याची घोषणा करावी लागली होती. ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम आजपासून सुरू करून मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाजपचे नवनियुक्त गोवा प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आज गोव्यात आहेत. मतदारांना आकर्षित करणाऱ्या मोठ्या आश्‍वासनांच्या घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोवा हे छोटे राज्य असले तरी त्यावर अनेक राष्ट्रीय पक्षांचे लक्ष आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचे दिग्गज नेते प्रचारासाठी गोव्याच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.

फडणवीस घेतील आज आढावा

हल्लीच गोव्याचे भाजप प्रभारी म्हणून निवड झालेले देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी तसेच पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी हे असतील. गोव्यातील भेटीत फडणवीस आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तयारीसंदर्भात व रणनितीवर मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी, आमदार, पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी सकाळी चर्चा करणार आहेत तसेच त्यानंतर संध्याकाळी पणजीतील गोमंतक मराठा समाज सभागृहात आयोजित पक्षाच्या मंडळ अध्यक्ष, भाजप युवा आघाडी, महिला मोर्चा, ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक विभाग यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन करतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

‘पंतप्रधानांना त्यांचा वाढदिवस साजरा करू द्या’ असे मी म्हटले यातून आता तुम्हाला माहीत झाले असेल की मला काय म्हणायचे होते.

-पी. चिदंबरम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com