संपकरी जीवरक्षकांनी पाठींबा देण्यासाठी येणाऱ्या नेत्यांची परीक्षा घ्यावी:रेजिनाल्‍ड

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

संपकरी जीवरक्षकांनी पाठींबा देण्यासाठी येणाऱ्या नेत्यांची परीक्षा घ्यावी. सध्या कामावर असलेल्या जीवरक्षकांना घेराव घालण्यासाठी जावे आणि त्यावेळी अशा पाठिंबा देऊन गेलेल्या नेत्यांना बोलवावे.

पणजी: संपकरी जीवरक्षकांनी पाठींबा देण्यासाठी येणाऱ्या नेत्यांची परीक्षा घ्यावी. सध्या कामावर असलेल्या जीवरक्षकांना घेराव घालण्यासाठी जावे आणि त्यावेळी अशा पाठिंबा देऊन गेलेल्या नेत्यांना बोलवावे. यातून कोणाचा पाठींबा किती सच्चा आहे, हे समजेल असा सल्ला आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी संपकरी जीवरक्षकांना दिला.

आझाद मैदानावर जीवरक्षक सोमवारपासून धरणे आंदोलन करत आहेत. यावेळी रेजिनाल्ड म्हणाले, एकजुटीने तुम्ही लढा द्या, तरच यश मिळेल. फुट पडली तर तुम्ही संपून जाल. आझाद मैदानावर आंदोलन करून न्याय मिळणार नाही. न्याय हक्कासाठी झगडलेच पाहिजे. संघर्षाशिवाय न्याय मिळणार नाही. कृती ही केलीच पाहिजे. संघर्षास तयार असाल आणि घेराव घालण्यास जाणार असाल तर मी तुमच्यासोबत आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.

कोविड महामारीमुळे अनेकजणांनी आपला व्यवसाय, नोकऱ्या गमावल्या आहेत. गोमंतकीय समाज घटकांना सरकारकडून आर्थिक मदतीची गरज आहे. असे असताना गोवा मुक्तीच्या षठ्यब्दीपूर्तीनिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करणे चुकीचे आहे. 

संबंधित बातम्या