MLA Chandrakant Shetye....म्हणून डिचोलीत यापूढे वीजपुरवठा खंडित होणार नाही

टप्प्याटप्याने मतदार संघातील इतर गावातील वीजेची समस्या सुटणार
underground power
underground powerDainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासून डिचोली शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या वाढली आहे. मात्र यापूढे असे होणार नाही. कारण डिचोली शहरात आता भूमिगत वीज तारा टाकण्यात येणार आहेत. याचे काम आजपासून ( 5 नोव्हेंबरपासून ) सुरू होणार आहे. त्यामूळे यापूढे वीजपुरवठा खंडित होणार नाही अशी माहिती आमदार चंद्रकात शेट्ये यांनी दिली आहे.

(MLA Chandrakant Shetye informed of laying 11 KV underground power cables in Bicholim town will start)

underground power
Goa News: आमोणे-डिचोलीतही बेधडकपणे रेतीउत्‍खननचे ‘रात्रीस खेळ चाले’

याबाबत बोलताना डिचोलीचे आमदार शेट्ये म्हणाले की, डिचोली शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या यापूढे असणार नाही कारण 11 KV क्षमता असलेली वीजेची तार जमिनीतून घेण्याचे काम सुरु आहे. यासाठी सुमारे 29 कोटी रुपये खर्च येणार आहे. मात्र प्रशासनाने सकारात्मकता दाखवल्याने हे शक्य झाल्याचं ते म्हणाले.

underground power
Fraud News: सुएलांकडून तक्रार मागे

सध्या डिचोली परिसरात असलेले विजेचे खांब व केबल्स यांना खुप कालावधी झाला आहे. त्यामूळे त्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यामूळे डिचोलीत वीज खंडीत होण्याची समस्या वाढली आहे. तसेच विजेचे खांब हलविण्यासारखी कामे कमी वेळेत होणे शक्य नाही, त्यामूळे कमी वेळेत जमिनीतून केबल्स घेणे महत्त्वाचं ठरणार असल्याचं ते म्हणाले. सध्या हे काम साळ आणि मेणकूरे या गावात सुरु आहे. मात्र टप्प्याटप्याने मतदार संघातील इतर गावात ही कामे सुरु केली जाणार असल्याची माहिती आमदार शेट्ये यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com