आमदार क्लाफास डायस इस्पितळातून घरी

Tukaram Govekar
रविवार, 9 ऑगस्ट 2020

गेले ४२ दिवस कोरोनाशी लढा देणारे कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस यांना अखेर काल गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे.

कुंकळ्ळी

आमदार क्लाफास डायस यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे मडगावच्या कोविड इस्पितळात ३० जून रोजी दाखल करण्यात आले होते. डायस यांच्या पत्नी, मुलगा व बहिणीलाही बाधा झाली होती. पत्नी, मुलगा व बहिणीला यापूर्वीच इस्पितळातून घरी पाठविण्यात आले होते.
डायस याची स्थिती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. गेल्या आठवड्यात डायस यांची कोरोना चाचणी नकारात्मक आल्यामुळे त्यांना गोवा वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी पुन्हा पॉजिटिव्ह आल्यामुळे वाद झाला होता. डायस यांना १५ दिवसांची विश्रांतीची गरज असून कोणीही भेटीसाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या