गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या; आमदार दयानंद सोपटे

2022 च्या निवडणुकीत आम्हाला 22 पेक्षा जास्त आमदार राज्यात भाजपचे निवडून आणायचे आहेत.
दयानंद सोपटे
दयानंद सोपटेdainik gomantak

मोरजी: देशात आणि राज्यात भाजपा शिवाय पर्याय नसल्याची जाणीव नागरिकांना होत असल्यानेच अनेक पक्षातील आमदार मंत्री नेते, कार्यकर्त्ये, समर्थक भाजपाकडे आकर्षित होवून पक्षात येत आहेत. 2022 च्या निवडणुकीत आम्हाला 22 पेक्षा जास्त आमदार राज्यात भाजपचे निवडून आणायचे आहेत. त्यासाठी मान्द्रेवासियांनी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भाजपचे (bjp)हात बळकट करण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी मोरजी पंचायत क्षेत्रात आपल्या प्रचाराचा श्रीफळ ठेवल्यानंतर कार्यकर्त्याना संबोधित करताना म्हटले.

सुरुवातीला दि.9 रोजी श्री सत्पुरुष देवाला आणि श्री मोरजाई देवीला श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी भाजपा नेत्या डॉक्टर शीतल नाईक, भाजपा निरीक्षक गोरख मांद्रेकर, संचालक सुदेश सावंत, भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, महिला अध्यक्षा दीपा तळकर, अनिशा केरकर, नयनी शेटगावकर, प्राजक्ता कान्नायिक, तारा हडफडकर, सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, पंच सुप्रिया पोके, पंच विलास मोरजे, पंच मुकेश गडेकर, पंच तुषार शेटगावकर, पंच प्रकाश शिरोडकर, माजी सरपंच मंदार पोके, माजी सरपंच धनंजय शेटगावकर, तुये सरपंच सुहास नाईक, पंच ममता सातार्डेकर, माजी सरपंच अनंत गडेकर, पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर आदी शेकडो कार्यकर्त्ये उपस्थित होते.

दयानंद सोपटे
परत जायला मी काय मोदी आहे? खरी कुजबूज!

आमदार दयानंद सोपटे (dayanand sopte) यांनी पुढे बोलताना म्हटले की, आपल्याला भविष्यात मांद्रे मतदार संघातील एकूण 9 मतदार संघाचा विकास करायचा आहे. सर्व कार्यकर्त्यांनी समर्थकांनी पक्षासाठी काम करण्याचे आवाहन केले. आणि भाजपचे सरकार स्वबळावर निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी केले.

मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब यांनी म्हटले की, राज्यात भाजपचे सरकार येईल आणि मान्द्रेचा (mandrem) भाजपचा उमेदवार हा बहुमतांनी निवडूनही येईल. शिवाय भाजपा सरकारात मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे हे मंत्री असतील असा विश्वास व्यक्त केला. विरोधकांवर आरोप करतांना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते वैफाल्ग्रस्त झालेले आहेत असे म्हणाले.

भाजपच्या नेत्या डॉक्टर शीतल नाईक यांनी बोलताना भाजपा सरकार हेच सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून विविध योजना राबवत असतात, आणि त्याला आकर्षित होवून आणि पक्षाचे काम पाहून अनेक नेते भाजपात येत आहे. आजच्या दिवशी मोरजी येथिल सरपंच वैशाली शेटगावकर यांच्या नैतृत्वाखाली पंचायत मंडळाने प्रवेश केला त्यांचे पक्ष स्वागत करत असल्याचे सांगितले.

दयानंद सोपटे
ही आहे गोव्यातील खरी कुजबूज..!

मोरजी येथिल सरपंच वैशाली शेटगावकर यांनी बोलतांना केंद्रात आणि राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकासाठी योग्य तो निर्णय आणि योजना राबवत असल्याने येत्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आमदार दयानंद सोपटे याना विजयी करण्याचे आवाहन केले.

महिला अध्यक्षा दीपा तळकर यांनी बोलतांना भाजपा शिवाय देशाला आणि राज्याला तसेच मान्द्रेत आमदार दयानंद सोपटे शिवाय पर्याय नाही, त्यांना मोठ्या मतांच्या फरकाने विजयी करण्याचे आवाहन दीपा तळकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com