मोरजीतील नळ कोरडेच; आमदार दयानंद सोपटे यांच्या हस्ते टँकर द्वारे पाणी पुरवठा

मोरजी पंचायत क्षेत्रातील काही भागात टेंकर द्वारे पाणी पुरवठा केला जात होता.
मोरजीतील नळ कोरडेच; आमदार दयानंद सोपटे यांच्या हस्ते टँकर द्वारे पाणी पुरवठा
Water supplyDainik Gomantak

निवडणुका (Elections) जवळ येताच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी गोमंतकियाना मोफत पाणी देण्याची घोषणा केली , तर दुसऱ्या बाजूने नागरिकाना चार चार दिवस नळांना पाणी येत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहे, चंदेल प्रकल्पातील पाणी कुठे जाते असा सवाल नागरिक उपस्थित करत आणि पाणी विभागाचे अधिकारी श्री व्होल्संन्स याना संपर्क केला तर ते सरळ विजेच्या लपंडावाकडे बोट दाखवून मोकळे होतात, दरम्यान मांद्रे मतदार संघातील जनता पाण्याविना आन पाण्यासाठी कशी धावपळ करतात यांची जाणीव ठेवून आमदार दयानंद सोपटे यांनी पाणी विभागाला आणि खाजगी टेंकर व्यावासायीकानाही सुचना देवून मतदार संघात कुणाकुणाला पाणी नाही तिथ पाणी पुरवठा करण्याचे सांगितले.त्यानुसार चार दिवसानंतर मोरजी पंचायत क्षेत्रातील काही भागात टेंकर द्वारे पाणी पुरवठा (Water supply) केला जात होता.

चांदेल पाणी प्रकल्पाचे पाणी मांद्रे मतदार संघात (Mandre constituency) वेळेवर पोचत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. आज नळांना येणार पाणी उद्या येणार म्हणून नागरिक महिला नळाकडे जाऊन नळ आला की नाही ते पाहत असतात. मांद्रे मतदार संघात प्रचंड पाण्याची तीव्रता जाणवत आहे ,कधी नळाला पाणी येईल याचा पत्ता लागत नाही ,अधिकारी पाणी पुरवठ्यावर दुर्लक्ष करतात मग नागरिक आमदारांना दोष देतात ,नळांना पाणीच नसेल तर आमदार म्हणून कुठून पाणी देणार. यंदाच्या वर्षी मोठ्याप्रमाणात पाण्याची समस्या उद्भवत आहे.

Water supply
भाजपाची रणनिती आखण्यासाठी जे. पी. नड्डा गोव्यात

यांची गंभीर दखल घेऊन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे सध्या मांद्रे मतदार संघात टँकर द्वारे पाणी पुरवठा घरोघरी करून लोकांची सोय करत आहे, टँकर घरापर्यंत जात नसल्याने रस्त्यावर बेरल ठेवून पाणी घ्यावे लागते ते पाणी नेण्यासाठी परत नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पेडणे तालुक्यातील चांदेल पाणी प्रकल्प बेभारवशाचा झाला असून संपूर्ण पेडणेकरांची तृष्णा भागवण्यासाठी हा प्रकल्प अपुरा पडत असल्याने आणि राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याने, प्रकल्पातून येणारे पाणी नक्की कुठे जाते याचा सरकारने शोध घ्यावा आणि पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिक करत आहे .

पाण्याची गंभीर समस्या मांद्रे मतदारसंघात उद्भवली असून या विषयावरून पाणी पेट घेण्याची श्यक्यता वर्तवली जात आहे. चांदेल पाणी प्रकल्पातून येणारे पाणी मांद्रे मतदारसंघात पोचताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, या अडचणीवर मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य. पार्सेकर यांनी खास तुये येथे 30 इमेल्डी पाणी प्रकल्प आणण्यासाठी प्रयज्ञ चालवले होते, त्याना निवडणुकीत अपयश आल्याने हा प्रकल्प मार्गी लागताना अनेक अडचणी निर्माण झाल्या, मात्र सरकार प्रक्रिया हि अनंत काळापासून चालूच असते, तीच प्रक्रिया विद्यमान सरकारने व स्थानिक आमदाराने पाठपुरावा करून हा प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणी होत असतानाच आमदार दयानंद सोपटे यांनी या प्रकल्पाचा पाठ पुरावा करून प्रकल्पाला मंजुरी मिळवून घेतली आहे, लवकरच या प्रकल्पाची पायाभरणी होईल अशी माही आमदार दयानंद सोपटे यांनी दिली.

पेडणे तालुक्यात चांदेल या ठिकाणी पाणी प्रकल्प आहे ,या प्रकल्पातूनच संपूर्ण तालुक्याला पाणी पुरवठा होतो .आणि हा प्रकल्प पेडणे मतदार संघात असल्याने अगोदर पाणी २४ तास या मतदार संघाला पुरवठा करावा असा आग्रह स्थानिक आमदार व मंत्र्याचा असल्याने अधिकारीही त्याच्या धमक्यांना बळी पडून पाणी पुरवठा त्याच मतदारसंघात नियमित करून मांद्रे मतदारसंघात दुजाभाव वागणूक दिली जाते, हा प्रकार मागच्या कित्येक वर्षापासून चालू आहे. राज्यकर्त्याचा पाणी विभागात हस्तक्षेप वाढल्याने हा प्रकार वाढीस लागत आहे.

क्षमता वाढत नाही मात्र नळ कनेक्शन वाढत आहे.

पेडणे तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात लोकवस्तीच्या परिसरात ठिकठीकाणी पारंपारिक विहिरी होत्या त्या विहिरींचे पाणी पिण्यासाठी दैनदिन जीवन जगण्या बरोबरच कपडे धुणे, झाडे शिपणे, गुर ढोर यांनाही वापरले जायचे, आता काळ बदलला पूर्ण नळाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस उद्धभवते आणि यावर मात करण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे.

Water supply
प्रखर संघर्षातूनच आपल्‍याला मिळते यश

सर्वसामान्यां नागरिकाना मुलभूत गरजा पुरवल्या तर ते समाधान मानतात. त्याना राजकारणात पडायचे नसते, मात्र राज्यकर्त्य पाण्यावरून देखील गावागावात, मतदार संघात व तालुक्यात फूट पाडायला पाहत आहेत आणि ते यशस्वी ठरतात आणि आपण मात्र भांडत राहतो, पाणी नाही म्हणून आंदोलने, अधिकाऱ्याना घेराव घालण्यासाठी रस्त्यावर सर्वसामान्य जनता उतरते, मात्र राज्यकर्त्याना कधी तीव्र पाण्याची झळ पोचत नाही पाणी नाही म्हणून ते कधी रस्त्यावर येवून ओरडत नाही. त्याना पाणी कुठून मिळते हाही प्रश्न समोर येतो.

पाण्यासाठी मंत्र्याचा हस्तक्षेप

ज्यावेळी तालुक्यातील जनतेसाठी एखादा पाणी प्रकल्प सरकार आणतो ते केवळ एका गावासाठी किंवा ठराविक मतदारसंघासाठी केंद्र बिंदू मानून आणत नाही तालुक्यातील पूर्ण जनतेला पाणी मिळाव हाच त्या मागचा उद्धेश असतो . मात्र ज्या ज्यावेळी धारगळ किंवा पेडणे मतदार संघातून निवडून येतो तो आमदार मंत्री पाणी विभागाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणून पाणी अगोदर आपल्या मतदारसंघातील जनतेला द्या, या लोकांनी खूप सोसले हि सहानभूती आमदाराची आपल्या मतदारांना आहे मात्र मांद्रे मतदारसंघातील जनतेने मंत्र्याचे कोणते घोडे मारले म्हणून त्याना हि वागणूक दिली जाते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com