आमदारांच्या निर्णयाचे स्वागत पण ढवळीतील चौपदरी रस्ता पुन्हा बंद!

पुन्हा रस्ता बंद करण्यात आल्याने गैरसोयीत अधिकच भर पडली आहे.
आमदारांच्या निर्णयाचे स्वागत पण ढवळीतील चौपदरी रस्ता पुन्हा बंद!
Four- laning of the highwayDainik Gomantak

फोंडा : फर्मागुढी ते ढवळी दरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण (Four- laning of the highway) रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने शनिवारपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर (Construction Minister Deepak Pauskar) यांनी दिले. शुक्रवारी या भागाचे आमदार तथा माजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी ग्रामस्थ तसेच पंचायत प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा रस्ता खुला केला होता. रस्ता खुला केल्याने येथील ग्रामस्थांनी आमदारांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते, मात्र आता पुन्हा रस्ता बंद करण्यात आल्याने गैरसोयीत अधिकच भर पडली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत.

फर्मागुढी ते ढवळीपर्यंतच्या महामार्गावरचे चौपदरी रस्त्याचे अपूर्णावस्थेतील काम पूर्ण करून येत्या 15 डिसेंबर पर्यंत हा रस्ता वाहतुकीस खुला करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी आज शनिवारी रस्त्याच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर दिली. तसेच गोव्यातील सर्व रस्ते 31 डिसेंबरपर्यंत हॉटमिक्स करण्यात येणार असून त्यात अंतर्गत रस्त्याचा समावेश आहे असे पाऊसकर म्हणाले.

Four- laning of the highway
‘व्हिजनरी’ संस्थेच्या 3 शाखांमध्ये 54 लाखांची अफरातफर; ठेवीदारांचा मुख्यमंत्र्यांना घेराव!

आमदार सुदिन ढवळीकर (MLA Sudin Dhavalikar) यांनी लोकांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन करताना गरज भासल्यास कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात येईल, असा इशाराही दिला. ढवळी येथील या चौपदरी रस्त्याला तीन उड्डाण पूल येत असून काही ठिकाणी रस्ता खचला आहे. फेर डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच पथदीप व गतीरोधक उभारण्याचे काम बाकी राहिले असल्याने हे शिल्लक काम त्वरित पूर्ण करण्यात येणार आहे.

या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे धोका उद्‍भवू शकतो, म्हणूनच हा रस्ता वाहतुकीसाठी सध्या बंद ठेवण्यात आला असल्याचे दीपक पाऊसकर यांनी सांगितले. शुक्रवारी खुला करण्यात आलेला रस्ता बंद करण्यात आला आहे. धोकादायक ठरू शकणारा हा रस्ता पुन्हा खुला केल्यास पोलिसांत तक्रार देणार.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com