आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार

दैनिक गोमंतक
बुधवार, 21 एप्रिल 2021

त्या याचिकांवर यापूर्वी झालेल्या सुनावणीवेळी 20 एप्रिल रोजी सभापती निर्णय देतील असे सांगण्यात आले होते.

पणजी: आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आता गुरुवारी सुनावणी होणार नाही. कोविड महामारी मुळे सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी कामकाज होणार नाही. यापूर्वी या प्रकरणी गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून भाजप मध्ये गेलेल्या दोघा आणि काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेल्या दहा आमदारांविरोधात विधानसभेच्या सभापतींसमोर सादर केलेल्या दोन वेगवेगळ्या अपात्रता याचिकांवर निर्णय घेण्यास सभापती राजेश पाटणेकर विलंब लावत असल्याने याचिकादार गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी दोन वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केल्या होत्या. (The MLA disqualification case will be heard in the Supreme Court on Thursday)

परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सोनू सूदने केली गोवा मुख्यामंत्रांकडे मागणी

त्या याचिकांवर यापूर्वी झालेल्या सुनावणीवेळी 20 एप्रिल रोजी सभापती निर्णय देतील असे सांगण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने 22 एप्रिल रोजी या याचिकांवर सुनावणी ठेवली होती. सभापतींनी निवाडा दिल्यानंतर याचिका फेटाळल्या गेल्या असल्याचे याचिकादारांना समजले त्या विषयी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी गुरुवारी होणाऱ्या सुनावणीची त्यांना प्रतीक्षा होती. मात्र आता ही सुनावणी होणार नसल्याने त्यांना नव्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे  सभापतींनी दिलेल्या निवाड्याविरोधात दाद मागावी लागणार आहे.

संबंधित बातम्या