वाहतूक बेटाविषयी टिकलो यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

बस्तोडा येथे तार नदीच्या परिसरातील जंक्शनवर नियोजित वाहतूक बेटाची उभारणी आणि त्या परिसराचे सौंदर्यीकरण तथा विद्युत रोषणाई यासंदर्भात कामाचा पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी त्या भागाची पाहणी केली.

म्हापसा, ता. ७ (प्रतिनिधी) : बस्तोडा येथे तार नदीच्या परिसरातील जंक्शनवर नियोजित वाहतूक बेटाची उभारणी आणि त्या परिसराचे सौंदर्यीकरण तथा विद्युत रोषणाई यासंदर्भात कामाचा पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी त्या भागाची पाहणी केली.

यावेळी बस्तोडाचे सरपंच रणजित उसगावकर, उपसरपंच, पंचायत सदस्य, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वीज विभागाचे अधिकारी विवेक सरदेसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाचे कनिष्ठ अभियंता सतीश वाळके इत्यादींची उपस्थिती होती.

हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन आमदार टिकलो यांनी बस्तोडा पंचायत मंडळाला दिले असल्याचे बस्तोड्याचे सरपंच रणजित उसगावकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
नैसर्गिक सौंदर्य राखून या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला हेतू असल्याचे आमदार टिकलो यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना स्पष्ट केले. अशा स्वरूपाची विकासकामे हाती घेताना पर्यावरणाला बाधा येणार नाही याची सर्वतोपरी दखल घेतली जाईल, असेही आमदार टिकलो म्हणाले. दरम्यान, पंचायत मंडळाने केलेल्या विनंतीला मान देऊन आमदार टिकलो यांनी या विषयासंदर्भात त्वरेने पाठपुरावा केल्याबद्दल बस्तोडाचे सरपंच रणजित उसगावकर यांनी आमदार ग्लेन टिकलो यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या