MLA Ulhas Tuyekar: भाजपचे काही उमेदवार पक्षाविरोधात काम करतायेत

आत्मघातकी प्रवृत्तीचा हायकमांडद्वारे बंदोबस्त करणार
Ulhas Tuyekar
Ulhas TuyekarDainik Gomantak

येत्या दोन दिवसात राज्यातील पंचायत निवडणूकांसाठीचे मतदान असल्याने सर्वच पक्ष सध्या हाय होल्टवर आहेत. आपल्या पक्षाचा मतदान टक्का वाढवण्यासाठी राज्यातील सर्वच नेते डावपेच आखत आहेत. यासाठी सर्व ताकद पणाला लावली जात आहेत. या पार्श्वभूमीवर नावेलीत ही प्रचाराला ही वेग आला आहे. यामूळे नावेलीचे भाजप आमदार उल्हास तुयेकर यांनी ही आज बैठक घेत मतदार संघातील सध्यस्थितीचा आढावा घेतला.

(MLA Ulhas Tuyekar addressed a press conference regarding Azadi ka Amrut Mohatsav in Navelim constituency)

Ulhas Tuyekar
...म्हणून पीडब्ल्यूडीची कामे रखडली- मंत्री निलेश काब्राल

या बैठकीत आमदार तुयेकर यांनी पक्षांतर्गत आत्मघातकी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कडक शब्दात सुनावले. ते म्हणाले की, आमच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणि पक्षाविरुद्ध काम करत आहेत. यांना मी सांगु इच्छीतो की, आम्ही याबाबत हायकमांडला कळवले आहे. आणि अशा प्रवृत्तीला कमी करण्यासाठी योग्यवेळीच उपाय योजले जातील असे ही ते म्हणाले.

Ulhas Tuyekar
Madgaon : मडगावात गाडेवाल्यांकडून आदेशाला केराची टोपली!

यावेळी आमदार तुयेकर यांनी नावेली मतदारसंघातील 'आझादी का अमृत मोहत्सवा'च्या संदर्भात पत्रकार परिषदेला संबोधित केले. या वेळी ते म्हणाले की, आपण सर्व मिळून यानिमित्ताने बाईक रॅली, मशाल रॅली आणि इतर अनेक कार्यक्रम नावेलीममध्ये आयोजित करणार आहोत. असे ही त्यांनी सांगितले.

भाजपचे उमेदवार मोठ्या प्रमाणात विजयी होतील

यावेळी आमदार तुयेकर म्हणाले की, भाजपचे अनेक कार्यकर्ते पंचायत निवडणूक लढवत आहेत. आणि मला खात्री आहे की. त्यापैकी बहुतेक कार्यकर्ते ही निवडणूक जिंकतील. तसेच ज्यांना आम्ही थेट पाठिंबा दिला आहे. व जे पंचायत निवडणूक लढवत आहेत. ते सर्व खात्रीने सांगतो की यशस्वी होतील असे ही ते म्हणाले.

पुढे बोलताना म्हणाले की, काही ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी लढत आहेत, अशा परिस्थितीत आम्ही तटस्थ भुमिका घेतली असून याबाबत पक्ष जी भुमिका घेईल त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ असे ही उल्हास तुयेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com