Sal River Pollution: मंत्री काब्राल अन् आमदार विएगस यांच्यात खडाजंगी

मंत्री निलेश काब्राल अन् आमदार वेन्झी विएगस यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच
Sal River
Sal RiverDainik Gomantak

शिरवडे मडगाव येथे असलेल्या सांडपाणी प्रकल्पातून दुषित पाणी थेट साळ नदीत सोडले जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत बाणावलीचे आमदार वेन्झी विएगस यांनी पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यासाठी दोषी असल्याचा आरोप केला आहे. काब्राल यांनी राजीनामा द्यावा असेही म्हटले आहे. हे प्रकरण आता वाढले असून या प्रश्नावरुन मंत्री निलेश काब्राल आणि आमदार वेन्झी विएगस यांच्यात आज चांगलीच जुंपली.

(MLA Venzy Viegas alleges Minister Nilesh Cabral on Sal River pollution issue)

Sal River
Fraud News: सुएलांकडून तक्रार मागे

काल दिनांक 4 नोव्हेंबर रोजी बाणावलीचे आमदार वेन्झी विएगस यांनी शिरवडे मडगाव येथे असलेल्या सांडपाणी प्रकल्पाला भेट देत मंत्री काब्राल हे साळ नदीच्या प्रदुषणाला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. यावरुन आज पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांनी प्रकल्प स्थळाला भेट दिली व या सर्व प्रकाराला संबधित अधिकारी जबाबदार आहेत. मी याबाबतचे आदेश दिले असताना अधिकाऱ्यांनी ते पाळले नाहीत, असे म्हटले आहे.

यावरुन दोन्ही नेत्यांत काही वेळ खडाजंगी पहायला मिळाली. यानंतर मंत्री काब्राल यांनी अधिकाऱ्यांना बोलावत आदेश देण्यात आला आहे. तर त्याची अंमलबजावणी का झाली नाही? असा सवाल करत हा प्रश्न तातडीने मार्गी लावा असे म्हटले आहे.

या दौऱ्यावेळी आमदार वेन्झी विएगस म्हणाले की, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने काल 4 नोव्हेंबर रोजी येऊन एसटीपी प्रकल्पाची पाहणी केली, परंतु त्यांना सांडपाणी नाल्यात कसे सोडले गेले ते आढळले नाही. ते वस्तुस्थिती नाकारात आहेत. प्रशासन पाण्यासाठी नागरिकांकडून पैसे वसूल करतात. तर नदीच्या प्रश्नावरुन यांच्यावर कारवाई का नाही? असा सवाल ही विएगस यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com